@maharashtracity

मुंबई: राज्य सरकारच्या मुंबईतील सर जे.जे. रुग्णालयात राज्यातील १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून शेकडो अस्थायी वैद्यकीय सहाय्यक प्राध्यापकांनी सोमवारपासून साखळी उपोषण सुरु केले आहे. या प्राध्यापकांना सरकारी सेवेत समावेश करुन घेणे आदी मागण्यांसाठी हे उपोषण (Fast by medical lecturers) सुरु करण्यात आले आहे.

उपोषणाशिवाय कोणताही पर्याय सरकारने शिल्लक न ठेवल्याने नाईलाजास्तव हे पाऊल उचलावे लागत असल्याचे उपोषणकर्त्या डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, गेल्या ५ ते ६ वर्षांपासून पाचशेहून अधिक सहाय्यक प्राध्यापक राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात (Govt medical colleges) रुग्णसेवा तसेच विद्यार्थ्याना शिकवत आहेत. तसेच ते इतरही कामे करत आहेत. मात्र या सहाय्यक प्राध्यापकांबाबत सरकारने प्रत्येकवेळी असंवेदनशीलता दाखवली.

मागील २ ते ३ वर्षांपासून हे प्राध्यापक मागण्यासाठी निवेदने देत आहेत. मात्र त्यांच्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे हताश होवून १०० हून अधिक प्राध्यापक नोकरी सोडून इतर राज्यात रुजू झाले. तर महाराष्ट्रात परराज्यातून डॉक्टर मागवले जात असल्याचेहि सांगण्यात आले.

मात्र येथील अस्थायी वैद्यकीय प्राध्यापकांचा सरकारी विचार करत नसल्याची तक्रार हे प्राध्यापक करत आहेत. दरम्यान, वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभागातील सर्वपदे तात्काळ भरली जातील अशी घोषणा सरकारने करुन देखील वैद्यकीय शिक्षण विभागाचा (medical education department) संपूर्ण भार हा प्रभारी पदावरच सुरु आहे. त्यामुळे प्राध्यापकांच्या मागण्या लक्षात घेवून लवकरात लवकर ठोस आणि कायमस्वरूपी पाऊल उचलावे, अशी मागणी या ज्येष्ठ प्राध्यापकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here