@maharashtracity

मुंबई: राज्यात सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, पालघर , नाशिक, पुणे, उस्मानाबाद सारख्या जिल्ह्यात चाचण्या वाढविण्याची गरज असल्याचे स्पष्ट होत आहे. या सोबत ज्या जिल्ह्यांचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर राज्याच्या सरासरी दरापेक्षा अधिक असल्याचे १४ सप्टेंबरच्या आठवडा अहवालात स्पष्ट झाले आहे, अशा जिल्ह्यात चाचण्या वाढविण्यात येणार आहे.

सध्या राज्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर २.६% असला तरी कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना सुरु आहेत. मागील काही दिवसांच्या तुलनेत कोरोना चाचण्यांचे प्रमाण २० टक्क्यांनी कमी झाले आहे.

राज्याच्या तुलनेत दहा जिल्ह्यात सरासरी चाचण्यांचे प्रमाण कमी आढळल्या. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

तसेच आरोग्य विभागाने नुकतेच अकोला, बुलडाणा,धुळे, हिंगोली, नांदेड, नंदुरबार, उस्मानाबाद, पालघर, परभणी आणि यवतमाळ जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

या जिल्ह्यांमध्ये दर दहा लाखांमागे अडीच लाखांपेक्षा कमी कोरोना चाचण्या करण्यात येतात. तर राज्यात दर दहा लाखांमागे सरासरी ४.३४ लाख कोरोना चाचण्या करण्यात येतात. तसेच सण उत्सवामुळे राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका वाढला आहे.

सध्या कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्याचे घटत्या रुग्णसंख्येतून दिसत आहे. मात्र परदेशात तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली असल्याने केंद्रानेही सतर्कतेचा इशारा दिला असल्याचे डॉ. व्यास यांनी सांगितले. केंद्राने दिलेल्या आदेशानुसार राज्यातील संसर्ग वाढीचा धोका लक्षात घेऊन या जिल्ह्यात कोरोना चाचण्यांचे वाढविण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here