@maharashtracity

मुंबई: राज्यात जबरदस्त कोरोना रूग्ण घट (drop in corona patients) दिसून येत असताना सोमवारी मुंबईपेक्षा ठाण्यात उपचाराधीन रूग्णसंख्या अधिक नोंदविल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. सोमवारी ठाण्यात (Thane) ६३ हजार १०९ रुग्णांवर तर मुंबईत ५० हजार ७५७ कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

राज्यांतील एकूण रुग्ण संख्येतही सोमवारी कमालीची घट नोंदवली गेली. राज्यातील एकूण नवी रुग्णसंख्या ३१ हजार १११ नोंदविण्यात आली.

सोमवारी ठाण्यात ६४ हजार २५९, तर मुंबईत ६० हजार ३७१ हजार सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या नोंदविण्यात आली. तसेच आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७२,४२,९२१ झाली आहे. तर रविवारी २९,०९२ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

राज्यात आजपर्यंत एकूण ६८,२९,९९२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (recovery rate) ९४.३% एवढे झाले आहे. दरम्यान राज्यात आज रोजी एकूण २,६७,३३४ ॲक्टिव्ह रुग्ण असल्याचे सांगण्यात आले.

राज्यात सोमवारी २४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९५% एवढा आहे. तर आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,२१,२४,८२४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७२,४२,९२१ (१०.०४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात २२,६४,२१७ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २,९९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे सांगण्यात आले.

मुंबईत ५९५६ बाधित

मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात ५९५६ एवढे रूग्ण आढळले. आता मुंबईत एकूण १००५१६५ रुग्ण आढळले. तसेच १२ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १६४६९ एवढी झाली आहे.

ओमिक्रॉन रूग्ण

राज्यात सोमवारी १२२ ओमिक्रॉन संसर्ग (omicron patients) असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी ८१ रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (NIV) आणि ४१ रुग्ण राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने रिपोर्ट केले आहेत. या १२२ रुग्णांमध्ये पुणे मनपा ४०, मीरा भाईंदर- २९, नागपूर २६, औरंगाबाद १४, अमरावती ७,
मुंबई ३, भंडारा, ठाणे मनपा आणि पिंपरी चिंचवड असे प्रत्येकी १ असल्याचे सांगण्यात आले.

आता आजपर्यंत राज्यात एकूण १८६० ओमिक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी ९५९ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी (RTPCR test) निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ४९८६ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी (genome sequencing) पाठविण्यात आले आहेत. यापैकी ६७ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here