@maharashtracity

सेंट्रलविस्टा प्रकल्पाच्या विरोधासाठी विरोधी पक्षांची निदर्शने

धुळे: संपूर्ण देश कोविड महामारीशी (covid) झगडत असताना नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्याऐवजी २३ हजार कोटी रूपये खर्चून पंतप्रधानांसाठी (PM) नव्या राजवाड्याची निर्मिती केली जात आहे. देशाला राजवाडा नव्हे तर दवाखान्यांची गरज आहे, अशी मागणी करीत या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी सेंट्रल व्हीस्टा (Central Vista) विरोधी भारत चळवळ उभारुन सोमवारी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली.

या आंदोलनात माकपचे (CPI-M) कॉ. एल.आर.राव, भाकपचे (CPI) कॉ. पोपट चौधरी, काँग्रेसचे (Congress) प्रमोद शिसोदे, सपाचे (SP) जमील मन्सुरी, राष्ट्रवादीचे (NCP) महेंद्र शिरसाठ आदी सहभागी झाले होते.

या संदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, इंडिया गेट (India Gate) परिसरात २०० एकर जमिनीवर सेंट्रल व्हीस्टा प्रकल्प साकारला जात आहे. त्यासाठी २३ हजार कोटींचा चुराडा होणार आहे. एका पंतप्रधानासाठी एवढ्या मोठ्या खर्चाचा नवा राजवाडा उभारणे योग्य नसून त्या ऐवजी कोविड महामारीशी लढणार्‍या जनतेसाठी आरोग्य सेवेच्या माध्यमातून सुसज्ज दवाखाने उभारले जावेत.

२३ हजार कोटीत थोडीथोडकी नव्हे तर एम्ससारखी (AIIMS) १९० सुसज्ज हॉस्पीटल उभारता येतील. म्हणून या व्हीस्टा प्रकल्पाला विरोध असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here