@maharashtracity

सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या कडून मागणीचा पुनरुच्चर 

 मुंबई: कोविशिल्ड लशीच्या ( covieshield vaccine) दोन डोसमधील ८४ दिवसांचे मोठ्या कालावधीचे अंतरच लसीकरणाच्या वेगाला खोडा करत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. 

शिवाय बहुतांश जणांनी कोविशिल्डची मात्रा घेतली असून याच्या दोन डोस मधील अंतर कमी करण्याच्या मागणीचा केंद्र सरकारने ( central government) विचार करावा, असा पुनरुच्चार आरोग्यमंत्री राजेश टोपे ( health minister rajesh tope) यांनी केला. 

यापूर्वी देखील टोपे यांनी दोन डॉस मधील अंतर कमी करण्याबाबत केंद्राला विचारले होते. दरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री मांडविया ( Union Health Minister Mandvia) यांनी सर्व राज्यांचा कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचा ( Covid preventive vaccination) आढावा घेतला. यावेळी ही मागणी करण्यात आली.  

राज्यातील सर्व पात्र नागरिकांना येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत कोविड प्रतिबंधात्मक लशीची पहिली मात्रा देण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने (health ministry) ठेवले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 
कोविड प्रतिबंधात्मक कोवॅक्सिन लशीच्या ( Covid preventive covaxin vaccine) दोन मात्रांमध्ये २८ दिवसांचे अंतर निश्चित करण्यात आले. 

तर कोविशिल्ड लशीच्या दोन मात्रांमधील अंतर हे ८४ दिवसांचे आहे. त्यामुळे कोविशिल्ड लशीच्या दोन मात्रामधील अंतर कमी करण्याची गरज असून त्याची फेरविचार होण्याची गरज आहे. तसे झाल्यास लसीकरणाला गती देता येईल.

लसीकरणाची गती वाढावी यासाठी मिशन कवच कुंडल ( mission kavach kundal) , मिशन युवा स्वास्थ्य ( mission yuva swasthya) सारखे अभियान राबविण्यात आले. याचा लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी फायदा झाला. 

आता लसीकरणाची शिबीर आणि वेळही वाढवली जात असल्याचे आरोग्य मंत्री टोपे यांनी स्पष्ट केले.

लसीकरणाच्या मोहिमेत आरोग्य, महसूल, नगरविकास, शिक्षण अशा विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी एकत्रित काम करीत असून राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी सरकारचा हा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले. 

शिवाय लसीकरणाबाबत नागरिकांच्या मनात असलेल्या शंका दूर करण्यासाठी जनजागृती केली जात आहे. यासाठी काही स्वयंसेवी संस्था, ओपिनियन लीडर्स, धर्मगुरु यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत, असे टोपे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here