@maharashtracity

मराठी भाषा व मराठी व्यक्तीच्या मागे उभे राहिले पाहिजे

स्वराज्य मिळाले पण सुराज्य कुठे आहे ?

मुंबई: कोकणातील (konkan) गणेशोत्सवाची (ganpati festival) सर दुनियेत कुठेही येणार नाही, असा दावा प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (shivsena urmila matondkar) यांनी केला आहे. जाणीव फाउंडेशन (janiv foundation), वृत्तमानस (vruttamanas), एकता मंच (ektamanch), आणि एलआयसी ऑफ इंडिया ( LIC of india ) यांच्या संयुक्त विद्यमाने दादर (dadar) , शिवाजी पार्क ( shivaji park) येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात (veer savarkar hall) पार पडलेल्या यंदाच्या गणपती आरास देखावा स्पर्धेच्या (Ganpati decoration scene competition) पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी ( Prize distribution ceremony ) त्यांनी वरीलप्रमाणे दावा केला आहे.

या कार्यक्रमाला स्पर्धेची संकल्पना मांडणारे खा.अरविंद सावंत ( MP arvind sawant) , वृत्तमानसचे संपादक दीपक म्हात्रे (editor dipak mhatre) , एलआयसी ऑफ इंडियाचे श्री. साबळे , संतोष परब, नगरसेविका अरुंधती दुधवडकर ( Corporator arundhati dudhvadkar) , माजी महापौर व नगरसेविका स्नेहल आंबेकर (Ex Mayor snehal ambekar) आदी मान्यवर उपस्थित होते.

मराठी भाषा व मराठी व्यक्तीच्या मागे उभे राहिले पाहिजे

या कार्यक्रमाचे भव्य रूप पाहून व मी आपल्या लोकांमध्ये आले असल्याचे मला वाटते. मी खूप देश फिरले पण इथे आल्यानंतर बाप्पाच्या संकल्पनेवर वेगळेदेखावे ज्यांनी उभारले त्यांना पारितोषिके देताना मजा आली. मी आपल्या लोकांमध्ये पुन्हा येईन व परितोषक विजेत्यांचे कौतुक करेन. तसेच, मराठी व्यक्ती व मराठी भाषेमागे, ठामपणे उभे राहिले पाहिजे, असे मतही उर्मिला मातोंडकर यांनी यावेळी व्यक्त केले.

स्वराज्य मिळाले पण सुराज्य कुठे आहे ?

लोकमान्य टिळकांनी ( lokmany tilak) घरातला गणपती रस्त्यावर आणून त्याला सार्वजनिक रूप दिले. सामाजिक लढाई स्वराज्याची लढाई होईल. तीही लढाईच होती. आपल्याला आज स्वराज्य मिळालं पण सुराज्य कुठे आहे, असा सवाल शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी यावेळी उपस्थित केला.

ही स्पर्धा आयोजित करण्या संदर्भात सचिन परब यांनी ३ महिन्यांपूर्वी सुचवले असता त्यांना लगेच होकार दिला. तसेच, माझ्या जाणीव फौंडेशनतर्फे कार्यक्रम घ्यावा, अशी सुचना केली होती.

आम्ही ही स्पर्धा केवळ मुंबई (mumbai) व उपनगरापुरती (mumbai suburban) आयोजित केली होती पण संपूर्ण राज्यातून प्रवेशिका आल्या त्याही घेतल्या मग परदेशातून म्हणजे अमेरिका (america) , टोकियो (tokyo), नेदरलँड (nedarland) येथून ही प्रवेशिका आल्या. समाजाला दिशा देण्याचे काम आपण करीत आहोत म्हणून त्याही प्रवेशिका घेतल्या. त्यामुळे ही स्पर्धा जागतिक स्वरूपाची झाली, असे मत खा. सावंत यांनी व्यक्त केले.

ऑनलाइन (online competition) झालेल्या या सजावट स्पर्धेचे परीक्षक मराठी मालिका दिग्दर्शक विवेक देशपांडे (director Vivek Deshpande) , नेपथ्यकार सुनील देवळेकर (Set designer Sunil Devalekar) , अभिनेत्री रुचिरा नाबर ( actress ruchira nabar) या तिघांचा तसेच स्पर्धेत योगदान दिलेल्या सर्वांचा सन्मान (felicited) उर्मिला मातोंडकर यांच्या हस्ते करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here