@maharashtracity

मुंबई: रोज तिपटीने रुग्णसंख्या वाढत असूनदेखील ऑक्सिजन (oxygen) गरज असलेले आणि व्हेंटिलेटरवर (ventilator) जाणाऱ्या गंभीर रुग्णांची संख्या दुसऱ्या लाटेच्या तुलनेत यावेळी कमी असल्याची बाब दिलासादायक ठरत आहे.

मुंबईतील कोरोना रुग्णांपैकी ८७ टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत (asymptomatic). तर पुणे जिल्ह्यातील ८५ टक्के रुग्ण देखील लक्षण विरहित आहेत. या गुरुवारी राज्यात ३६ हजार २६५ तर मुंबईत १९ हजार ७८० नवे कोरोना रुग्ण आढळून आले. मात्र राज्यातील एकूण कोविड बेड संख्येच्या ३.८४ टक्के बेड्सवर सध्या रुग्ण आहेत.

बाकीची बेड मोकळी असल्याची नोंद तिसऱ्या लाटेतून करण्यात येत असल्याची बाब दिलासादायक ठरत आहे. असे असले तरी कोविड वर्तणूक आणि लसीचा डोस आवश्यक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत.

दरम्यान, दुसऱ्या लाटेत सुमारे एवढ्याच रुग्ण संख्येत ८५२७ रुग्ण ऑक्सिजन बेडवर होते. तर सद्यस्थितीत ऑक्सिजन बेडची संख्या २५६० म्हणजे एक तृतीयांश पेक्षा कमी असल्याची सांगण्यात येत आहे. ४ मार्च २१ रोजी ८५ हजार १४४ सक्रिय रुग्ण असल्याची नोंद होती.

राज्य सर्वेक्षण अधिकारी डाॅ. प्रदीप आवटे यांनी ट्विट करत मुंबईत ८७ टक्के रुग्ण तर पुण्यात ८५ टक्के रुग्ण लक्षणरहित आहेत असे म्हटले आहे. त्यामुळे काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मात्र भीतीने घाबरून जाण्यासारखे सध्या तरी स्थिती नसल्याचे डाॅ. आवटे यांनी सांगितले.

तसेच दुसऱ्या लाटेत सुमारे एवढ्याच रुग्ण संख्येत ८५२७ रुग्ण ऑक्सिजन बेडवर होते. तर तिसऱ्या लाटेत तेवढीच रुग्ण संख्या असताना २५६० म्हणजे एक तृतीयांश पेक्षाही कमी ऑक्सिजन बेडवर रुग्ण असल्याची बाब दिलासादायक ठरत आहे.

यावर बोलताना मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, सध्या सक्रिय रुग्ण संख्या वाढत आहे. बाधित आढळून येत आहेत. मात्र ऑक्सिजन बेड रिक्त आहेत. लसीकरणामुळे कोरोनाचा दुष्परिणाम या लाटेत दिसून येत नसल्याने रुग्णांना ऑक्सिजन बेड कमी गरज भासत असल्याचे चित्र असल्याचे काकाणी म्हणाले. मात्र कोविड वर्तणुकीला महत्व देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here