@maharashtracity

रत्नागिरी ०.०८ तर सिंधुदुर्ग ०.०४ टक्के साप्ताहिक रुग्ण वाढ दर

मुंबई: राज्यातील साप्ताहिक कोरोना रूग्णवाढ दर ०.०५ टक्के एवढा आहे. असे असताना राज्यातील सहा जिल्ह्यातील साप्ताहिक कोरोना रूग्ण वाढ दर याहून अधिक असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. यामुळे किंचित चिंता वाढली असली तरी रूग्ण वाढ दर कमी करण्याचा सर्वंकष प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात आले. (increase in corona patients)

या सहा जिल्ह्यात अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात रूग्ण दर वाढ अधिक असून तो ०.२३ टक्के एवढा आहे. तर उर्वरित सातारा (Satara) ०.१२, सोलापूर (Sholapur) ०.१२, सांगली (Sangli) ०.११, रत्नागिरी (Ratnagiri) ०.०८, पुणे (Pune) ०.०७, बीड (Beed) ०.०६ आणि उस्मानाबाद (Osmanabad) ०.०६ टक्के एवढा आहे.

सध्या कोरोना रूग्ण संख्या कमी होत असताना साप्ताहिक अहवालातून ही माहिती समोर येत आहे. रूग्ण दर वाढ काही अंशाने अधिक असला तरीही नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मात्र, अद्यापही कोरोना गेला नसून कोविड वर्तणूकिचे पालन करण्यावर भर द्यावी अशी सूचना वारंवार देण्यात येत आहे. दरम्यान कोकण प्रदेशातील रायगड (Raigad) जिल्हा आणि मुंबई जिल्ह्यातील रूग्ण वाढ दर राज्याच्या रूग्ण दर वाढी एवढा म्हणजेच ०.०५ टक्के आहे. तर ठाणे (Thane) ०.०४, सिंधुदुर्ग (Sindhudurg) ०.०४ आणि पालघर (Palghar) ०.०३ टक्के असा काही अंश टक्क्यांनीच कमी आहे. या सोबत कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यतील रूग्ण वाढ दर ०.०३ टक्के एवढा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here