@maharashtracity

वैद्यकीय तज्ज्ञांचा इशारा

मुंबई: कोरोना महामारीमुळे (corona pandemic) बहुतांश श्रमजीवी प्रौढ व्यक्ती व मुलांना कामासाठी किंवा शिक्षणासाठी दीर्घकाळापर्यंत स्क्रीन्ससमोर बसून राहणे आवश्यक ठरत आहे. तरूण पिढी सतत मोबाइलवर असल्याने स्ट्रोकचा धोका वाढत असल्याचा इशारा वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत. (Threat of stroke due to high use of mobile screen)

स्क्रिन्समधून उत्सर्जित होणारी ब्ल्यू किरणे मेलाटोनिन निर्मिती कमी करते. ज्यामुळे वेळेवर झोपून लवकर उठणे अवघड होऊन जात असल्याचे न्युरो सर्जन डॉ. उज्वल येवले (Neurosurgeon Dr Ujjwal Yeole) यांनी सांगितले.

डॉ. येवले यांनी पुढे सांगितले की, अमेरिकन स्ट्रोक असोसिएशनच्या (American Stroke Association) २०२१ संशोधनातून स्क्रीनवर अधिक वेळ व्यतित करणाऱ्या तसेच बैठेकाम जीवनशैली असलेल्या ६० वर्षांखालील प्रौढ व्यक्तींना शारीरिकदृष्ट्या सक्रिय असलेल्या व्यक्तींचा तुलनेत स्ट्रोकचा धोका आहे.

वर्ल्ड स्ट्रोक ऑर्गनायझेशनच्या (World Stroke Association) माहिती प्रमाणे चारपैकी एका व्यक्तीला त्यांच्या जीवनात स्ट्रोक अटॅक आला असावा. तर दि लॅन्सेण्ट ग्लोबल हेल्थ संशोधनातून भारतातील असंसर्गजन्य न्यूरोलॉजिकल आजारांचे प्रमाण १९९० मधील ४.० टक्क्यावरून २०१९ मध्ये ८.२ टक्क्यांपर्यंत दुप्पट झाले असल्याचे सागण्यात आले.

Also Read: न्युमोनियाच्या जोडीला कर्करोगाची घातकी साथ

भारतातील १.८ दशलक्ष व्यक्तींना दरवर्षी स्ट्रोक येतो. तसेच डिजिटल स्क्रीनवर व्यतित केलेल्या दर एका तासामुळे व्यक्तीची जीवनमर्यादा जवळपास २२ मिनिटांनी कमी होते. यामुळे व्यक्तीला स्ट्रोक आणि विविध हृदयविषयक आजार, कर्करोग इत्यादींचा धोका निर्माण होत असल्याचे संशोधानातून समोर येत आहे.

शिवाय डिजिटल स्क्रीन्सवर (लॅपटॉप, टीव्ही, मोबाइल इत्यादी) सतत २ तास व्यतित केल्याने स्ट्रोकचा धोका वाढत असल्याचे डॉ. येवले यांनी सांगितले. दोन तासांपेक्षा अधिक वेळ मोबाइल मनोरंजनाचे व्यसन जडले असेल तर स्ट्रोकचा धोका २० टक्क्यांनी वाढतो.

स्ट्रोक हा उपचार करता येऊ शकणारा आजार आहे. यासाठी चांगल्या सवयी लावण्याची सुचना तज्ज्ञ करत आहेत.

सुचना :

दुष्परिणाम टाळण्यासाठी दररोज एक तास चालण्याचा व्यायाम करावा.

दररोज ३० मिनिटे व्घ्यायाम (exercise) करा.

स्क्रीनवर व्यतित केला जाणारा वेळ कमी करा.

लॅपटॉपसमोर बसून काम करावे लागत असेल तर वारंवार ब्रेक घ्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here