@maharashtracity

मुंबई: मुंबईत मागील काही दिवसांत ३ लाख कोविड सेल्फ टेस्ट किटची विक्री झाली असून त्यापैकी केवळ ९८ हजार ९५७ नागरिकांनीच आपले अहवाल ऍपवर अपलोड केले आहेत. त्यामधून ३ हजार १४९ नागरिक कोरोना पॉजिटीव्ह (covid positive) आल्याचे समोर आले आहे. मात्र उर्वरित २ लाख लोकांच्या अहवालाची नोंदच झालेली नसल्याची माहिती समोर आल्याने त्याबाबत संशय निर्माण झाला आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन मुंबई महापालिकेने (BMC) आता २ लाख कोविड सेल्फ टेस्ट किटचा वापर कुठे, कसा, किती वापर झाला याची झाडाझडती घेण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. किटची विक्री करणाऱ्या औषध विक्रते दुकानदार (medical shops) यांना ‘कोविड टेस्टिंग सेल्फ किट’ विक्रीचा रेकॉर्ड ठेवणे पालिकेने बंधनकारक केले आहे.

मुंबईत कोविड (covid in Mumbai) व ओमायक्रॉनच्या (omicron) रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. त्यातच अनेकजण कोविड सेल्फ टेस्ट किटचा (covid self test kit) वापर व्यक्तीगत करतात व त्याची नोंदही करीत नाहीत. त्यामुळे मुंबईतील कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची अचूक संख्या कळत नाहीये. अनेकजण होम क्वारेंटाईन (Home Quarantine) आहेत.

गेल्या काही दिवसांपासून कोविड रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. त्यामुळे रुग्ण संख्या २० हजारांवर गेली होती. आता दोन – तीन दिवसांत कोविड रुग्ण संख्या ६ – ७ हजारांनी घटली आहे.

अनेकांना ताप, खोकला, सर्दीचा त्रास होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये काहीशी भिती निर्माण झाली. अनेकांनी कोविडचे निदान करण्यासाठी बाजारात मेडिकल स्टोअर्समध्ये विक्री करण्यात येत असलेल्या ‘कोविड टेस्टिंग सेल्फ किट’ चा मोठ्या प्रमाणात वापर केला.

पालिकेने या किटचा वापर करणाऱ्या नागरिकांनी सेल्फ टेस्ट किटच्या वापराबाबतची माहिती ऍपवर अपलोड करावी, असे आवाहन केले आहे. त्यामुळे आता काही लोक त्याला चांगला प्रतिसाद देत आहेत.

पालिकेने सदर किट बनवणारे (kit manufacturer) व त्याचे वितरण व विक्री करणारे यांना किट कोण विकत घेत आहे त्याचे नाव, त्याचा पत्ता आणि संपर्क क्रमांक नोंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मॅनुफॅक्चरर आणि डिस्ट्रिब्युटर (distributor) यांनी ती माहिती पालिकेला द्यावी असे सांगण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here