@the_news_21

@maharashtracity

राज्यात १४,३७२ नवीन रुग्ण

मुंबई: राज्यात मंगळवारी १४,३७२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. सोमवारच्या तुलनेत सुमारे १ हजाराने हि घट आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७७,३५,४८१ झाली आहे. काल ३०,०९३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७३,९७,३५२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६३% एवढे झाले आहे.

दरम्यान, राज्यात मंगळवारी ९४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८४% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,४७,८२,३९१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७७,३५,४८१ (१०.३४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १०,६९,५९६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २,७३१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत ८०३ बाधित

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ८०३ एवढे रूग्ण आढळले. आता मुंबईत एकूण १०,४६,४७५ रुग्ण आहेत. तसेच ७ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १६,६३० एवढी झाली आहे.

एकही ओमिक्रोन रुग्ण नाही

मंगळवारी एकही ओमिक्रोन बाधित रुग्ण आढळला नाही. आतापर्यंत राज्यात एकूण ३२२१ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी १६८९ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. एकूण ६७१६ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी ६६२६ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि ९० नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here