@maharashtracity

सरकारी रुग्णालयात २१,७७५ मृत्यू

खासगी रुग्णालयात ७४५१ मृत्यू

मुंबई: सन २०१८, २०१९ आणि २०२० या वर्षात तीन वर्षात सरकारी रुग्णालयात टीबी रुग्णांचे (TB patients) मृत्यूचे प्रमाण चढते असल्याची माहिती माहिती अधिकारातून समोर येत आहे. तर

खासगी रुग्णालयातील मृत्यूसंख्या किंचित कमी असल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे. टीबी मृत्यूची माहिती माहिती अधिकारातून (Right to information) समोर आली असून २०१९ या एका वर्षात सर्वाधिक मृत्यू झाले तर २०२० या वर्षात २०१९ च्या तुलनेत कमी मृत्यू कमी झाल्याची माहिती मिळत आहे.

माहिती अधिकारी कार्यकर्ते चेतन कोठारी (RTI activist Chetan Kothari) यांनी दिलेल्या माहिती नुसार २०१८ या वर्षात सरकारी रुग्णालयात ७२९२ मृत्यू तर खासगी रुग्णालयात १२४९ एवढे मृत्यू झाले. तर २०१९ मध्ये सरकारी रुग्णालयात (government hospitals) ७४९५ तर खासगी रुग्णालयात (Private hospitals) २७७७ एवढे मृत्यू झाले अशी माहिती मिळाली आहे.

दरम्यान, २०१९ या वर्षात सरकारी तसेच खासगी रुग्णालयातील टीबी रुग्णांचा मृत्यू आकडा सरकारी रुग्णालयात २०१८ वर्षाच्या तुलनेत सुमारे दोनशेने तर खासगी रुग्णालयातील टीबी मृत्यू १५२८ एवढ्या संख्येने चढी असल्याचे दिसून येत आहे. तसेच २०२० वर्षीच्या कोरोना काळात सरकारी रुग्णालयात टीबी मृत्यू ५३३७ तर खासगी रुग्णालयात २४५९ एवढ्याने वाढलेली दिसून येत आहे.

Also Read: ८० टक्के खाटा ताब्यात द्या

तसेच २०२१ वर्षातील मार्च महिन्यापर्यंत तीन महिन्याची आकडेवारीनुसार सरकारी रुग्णालयात १४५१ तर खासगी रुग्णालयात ६५५ एवढे टीबी मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. यावर बोलताना शिवडी टीबी रुग्णालयाचे (Sewri TB Hospital) माजी वैद्यकीय अधीक्षक डाॅ. ललित आनंदे यांनी सांगितले की, भारतात २०२० वर्षात ५ लाख मृत्यूची नोंद आहे. कारण कोरोना काळात टीबी रुग्णांकडे दुर्लक्ष झाले. टीबी रुग्णालयातील बराचसा स्टाफ कोविड कर्तव्यावर होता. त्यामुळे राज्यभरातील टीबी रुग्ण दुर्लक्षित झाले असल्याचे डॉ आनंदे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here