@maharashtracity

मुंबई: पुणे जिल्ह्यातील मंचर ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर करण्याला राज्याच्या नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे. आज राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्याचे गृहमंत्री आणि आंबेगाव मतदारसंघाचे आमदार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse-Patil) आणि माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील (Shivaji Adhalrao Patil) यांच्या उपस्थितीत याबाबतची घोषणा केली.

2011 सालच्या लोकसंख्येनुसार मंचर (Manchar) ग्रामपंचायतीची लोकसंख्या 21 हजार 841 एवढी झालेली होती. त्यामुळे 2013, 2015 आणि 2019 साली या ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याचा प्रस्ताव ग्रामपंचायतीने बहुमताने मंजूर करून राज्य शासनाकडे पाठवला होता.

मंचर ग्रामपंचायत हद्दीतील अकृषक रोजगाराची टक्केवारी देखील 59.15 टक्के एवढी होती. वाढती लोकसंख्या आणि नागरिकांची मागणी यांचा विचार करून या ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत करण्याला राज्याच्या नगरविकास विभागाने (Urban Development Department – UDD) मंजुरी दिली असल्याची घोषणा शिंदे यांनी केली.

Also Read: राज्यात 1 डिसेंबरपासून पहिलीपासूनच्या शाळा सुरू होणार!

या श्रेणीवर्धनासोबत तिथे प्रशासनिक पदांची निर्मिती करण्यासाठी मुख्याधिकारी आणि इतर पदांची निर्मिती करण्याला देखील शासनाने मंजुरी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here