ऑनलाईन रजिस्ट्रेशनसह वाॅक इन  लसीकरण सुविधा 

@maharashtracity

मुंबई: मुंबई पालिका (BMC) क्षेत्रात उद्या (गुरुवारपासून) गर्भवती महिलांचे लसीकरण (vaccination of pregnant women)सुरु करणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. यासाठी राज्य सरकारकडून पालिकेला ४५००० लसीचे डोस प्राप्त झाले आहेत. याच्या तुलनेत मात्र मुंबईत सुमारे दिड लाख गर्भवती महिला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

यावर बोलताना पालिकेच्या  कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, गुरुवारपासून गर्भवती महिलांचे लसीकरण केले जात आहे. जवळपास 30 केंद्रांवर लसीकरण होणार आहे. प्रमुख वैद्यकीय रुग्णालये, प्रसूतीगृह आणि काही उपनगरीय रुग्णालयात लसीकरण केले जाईल. 

प्रसूतीगृहातील ओपीडीत जाणार्‍या गर्भवतींचे समुपदेशन केले जात आहे. शिवाय, लसीकरण केंद्रांवरही त्यांना लसीकरणाविषयीची माहिती दिली जाईल. त्यानंतर, त्यांना लसीकरण केले जाईल. गर्भवती महिलांना लस देताना कर्मचार्‍यांना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात याविषयी प्रशिक्षण दिले गेले आहे. सामान्य नागरिकांच्‍या वेळेतच गर्भवती महिलांच्या लसीकरणाची वेळ असणार आहे.

मुंबईतील गर्भवती महिलांना कोरोनाच्या संसर्गापासून वाचवण्यासाठी पालिकेने त्यांच्या लसीकरणाची पूर्ण तयारी  केली आहे. पालिकेच्या मॅटर्निटी होममध्येही लसीकरण केले जाणार आहे. गर्भवती महिलांना लसीकरण केंद्रांवर प्राधान्याने लस दिली जाईल. ऑनलाईन रजिस्ट्रेशनसह वाॅक इन ही करता लसीकरण होईल. रजिस्ट्रेशन केले तर लवकर लसीकरण होऊ शकेल असे ही डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले. 

गर्भवतींच्या लसीकरणासाठी वाढलेल्या प्रतिसादानुसार केंद्रांमध्ये वाढ केली जाईल. स्तनदा मातांचा ही अजून कमी प्रतिसाद आहे. त्यानुसार, गर्भवती ही पहिल्या दिवशी जास्त गर्दी करतील असे वाटत नाही. त्यामुळे, सध्या पुरेसा साठा उपलब्ध नसला तरी लसीकरण सुरळीत होऊ शकेल असे ही डाॅ. गोमारे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here