@maharashtracity
मुंबई: मलबार हिल (Malabar Hill) परिसरातील बाणगंगा येथे म्हाडा (Mhada) इमारतीच्या आवारातील संरक्षक भिंत अचानक कोसळून झालेल्या दुर्घटनेत हितेश शिवराम भुवड (३७) ही व्यक्ती गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडली.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, मलबार हिल, बाणगंगा परिसरातील म्हाडाच्या मालकीच्या बालाजी निवास या इमारतीची संरक्षक भिंत शनिवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास कोसळली.
या भिंत दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, अग्निशमन दलाचे जवान, म्हाडाचे संबधित अधिकारी, कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्याला सुरुवात केली.
या दुर्घटनेत हितेश शिवराम भुवड (३७) ही व्यक्ती जबर मार लागल्याने गंभीर जखमी झाली. या व्यक्तीला जखमी अवस्थेत नजीकच्या एलिझाबेथ या खासगी रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाचे डॉ.वृशाली यांनी कळविले आहे.
मात्र ही भिंत कोसळण्याची दुर्घटना का व कशी घडली याबाबत पोलीस, म्हाडा, अग्निशमन दल अधिक तपास करीत आहेत.