@maharashtracity

मुंबई: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांत १४ लाख १४ हजार ३५० दशलक्ष लिटर इतका (९७.७२%) पाणीसाठा (Water storage in dams) जमा झाला आहे. मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जात असल्याने सदर पाणीसाठा हा पुढील ३६७ दिवस म्हणजे पुढील वर्षभर म्हणजेच १४ सप्टेंबर २०२२ पर्यंत पुरेल इतका आहे.

त्यामुळे पुढील वर्षी जरी पाऊस जून महिन्यात अथवा जुलै महिन्यापर्यंत जरी लांबला तरी मुंबईकरांना पाणीकपातीच्या संकटाला तोंड द्यावे देण्याची गरज भासणार नाही. विषेश म्हणजे मुंबईला पावसाळा संपल्यावर पुढील वर्षभरासाठी ७ तलावांत मिळून एकूण १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याची गरज भासते.

त्या तुलनेत यंदा चांगला पाऊस पडल्याने ७ तलावांत एकूण १४ लाख १४ हजार ३५० दशलक्ष लिटर इतका (९७.७२%) पाणीसाठा जमा झालेला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी चार तलाव १६ ते २२ जुलै या एका आठवड्याच्या कालावधीत भरून वाहू लागले होते.

यामध्ये, तुळशी तलाव सर्वप्रथम १६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता, विहार तलाव १८ जुलै रोजी सकाळी ८.४५ वाजता, मोडक सागर तलाव २२ जुलै रोजी मध्यरात्री ३.२४ वाजता तर तानसा तलाव २२ जुलै रोजी सकाळी ५.४८ वाजता भरून वाहू लागला होता. त्यात आता भातसा तलावसुद्धा जवळजवळ ९७% पेक्षाही जास्त भरला आहे.

त्यामुळे आता फक्त मध्य वैतरणा व अप्पर वैतरणा हे दोन तलाव भरायचे बाकी आहेत. या दोन्ही तलावांत सध्या ९५% पेक्षाही जास्त पाणीसाठा जमा आहे.

अद्यापही पावसाळ्याचा अर्धा महिना बाकी आहे. त्यामुळे जोरदार पाऊस बरसला तर अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा हे दोन तलाव व भातसाही काठोकाठ भरून तलाव वाहू लागतील.

तलावांची स्थिती

तलाव पाणीसाठा टक्केवारी

अप्पर २,१२,५८२ ९३.६३%
वैतरणा

  मोडक        १,२८,९२५    १००.००%
  सागर

  तानसा          १,४४,८२८     ९९.८३%

मध्य वैतरणा    १,८५,३८६       ९५.७९%

  भातसा       ७,०६,८८६        ९८.५८%

  विहार            २७,६९८          १००%

   तुळशी             ८,०४६          १००%
--------------------------------------------------
    एकूण       १४,१४,३५०       ९७.७२%

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here