@maharashtracity

पालिकेला अद्याप मार्गदर्शक सूचना नाही

मुंबई: राज्यातील १२ ते १८ वर्षाच्या वयाेगटावरील मुलांना झायकाेव्ह डी (Zycov D vaccine) या लसीच्या तीन मात्रांना सेंट्रल महाऔषधी नियंत्रकांनी मान्यता दिली आहे. जगातील ही पहिली डीएनए लस (DNA vaccine) असून ती भारतात तयार करण्यात आली आहे.

केंद्रीय औषध प्रमाणीकरण संस्थेच्या तज्ज्ञ समितीने या लशीच्या आपत्कालीन वापराची शिफारस केली हाेती. १२ ते १८ वर्षाच्या वयाेगटातील लसीकरण सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर सुरु हाेण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. मात्र संबंधित लसीकरणाच्या मार्गदर्शक सूचना (Guidelines) पालिकेला प्राप्त झाल्या नसल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, कोणत्याही लसीकरण मोहिमेची मार्गदर्शक प्रणाली केंद्र सरकार प्रत्येक राज्याला देत असते. पुढे राज्य सरकार पालिकेच्या आराेग्य विभागाला (health department) त्या गाइडलाईन देत असते. मात्र लहान मुलांच्या लसीकरणाबाबत माहिती केंद्र सरकारने दिली नसल्याचे पालिकेचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी सांगतात.

तर झायडस कॅडिला या स्वदेशी कंपनीने बनवलेल्या झायकोव्ह डी या लसीच्या वापरासाठी शुक्रवारी आपत्कालीन मान्यता प्राप्त झाली. लसीची उपयुक्तता जाणण्यासाठी
झायडस कॅडिला कंपनीने माहिती दिली.

झायडस कॅडिलाचे एमडी डॉ. शर्विल पटेल म्हणाले की, लस वापरासाठी आता मंजुरी मिळाली आहे. पुढील आठवड्यापर्यंत लस दर निश्चित करू. प्रत्येक लस बनवताना खर्च आणि तंत्रज्ञान वेगळे असते आणि त्या आधारावर किंमत निश्चित केली जात असल्याचे डॉ. शर्विल पटेल म्हणाले.

लस पुरविण्यासाठी विलंब होत असून सप्टेंबरच्या मध्यापर्यंत ४० ते ४५ लाख डोस पुरविण्यात येतील. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये सुमारे एक कोटी तर जानेवारीपर्यंत उत्पादन क्षमता पाच कोटी डोसपर्यंत करण्याची शक्यता कंपनीने वर्तविली. झायकोव्ह डी कोविड विरूद्ध ६६ टक्के प्रभावी असून डेल्टाविरोधातही (Delta) उपचार करणारी आहे.

यावर पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, अजूनपर्यंत राज्य सरकारकडून कोणतीही मार्गदर्शक सूचना मिळालेली नाही. त्यामुळे त्याबद्दल काहीही वक्तव्य करणे चुकीचे ठरेल. मात्र, ही लस सप्टेंबरच्या अखेरीस येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

कोणत्या वयोगटातील लोकांना लस द्यायची आहे, तसेच, मुंबईत (Mumbai) लसीकरणासाठी लाभार्थी वयोगटाची लोकसंख्या किती आहे आणि या वर्गाचे लसीकरण कसे केले जाईल? याबाबत सरकारकडून मार्गदर्शक सूचना आल्यानंतरच या लसीकरणाची रूपरेषा ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here