Twitter: @SantoshMasole

धुळे: मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या पळासनेर (ता.शिरपूर) येथे सापळा रचून वागळे (ठाणे) पोलीसांच्या पथकाने एक संशयिताकडून एक मशिनगन, २० पिस्टल व २८० जिवंत काडतुस असा मोठया प्रमाणात अग्निशस्त्रसाठा जप्त केला. १० जुलै रोजी ही कारवाई झाली असून अटकेतील संशयितास १७ जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

उपलब्ध माहितीनुसार सुरजीतसिंग उर्फ माजा आवसिंग (वय २७ रा. मु. उमर्टीगाव पो. बलवाडी ता. वरला जि. बडवानी (मध्यप्रदेश) हा शस्त्र विक्री साठी पळासनेर (ता.शिरपूर) येथे येणार असल्याची गुप्त माहिती ठाणे गुन्हे शाखेचे (घटक ५) वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती. या आधारावर पोलिसांचे पथक १० जुलै रोजी पळासनेर तेथे पोहोचले होते.

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सुरजीतसिंग तिथे पोहोचला आणि पोलिसांनी त्याला पकडले. यावेळी केलेल्या अंग झडतीत त्याच्याकडे २० गावठी बनावटीचे स्टिल पिस्टल, १ गावठी बनावटीची मशिनगन, २ मॅग्झीनसह २८० जिवंत काडतुसे असा मोठया प्रमाणात अग्निशस्त्रसाठा सापडला.

पोलिसांनी त्याला ११ जुलै रोजीटक अटक केली व न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास १७ जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पोलीस आयुक्त जयजित सिंग, पोलीस सह आयुक्त दत्तात्रय कराळे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त राजेंद्रकुमार दाभाडे (गुन्हे, अतिरिक्त कार्यभार), पोलीस उप आयुक्त गुन्हे शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध १) निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली वागळे युनिट-५ ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके, सहाय्यक
पोलिस निरीक्षक भुषण शिंदे व अविनाश महाजन यांच्यासह पथकातील अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने ही कारवाई झाली.

Previous articleमुंबईत पावसाळी आजारांत वाढ
Next articleन्यायालयाने फटकारताच मंत्री रवींद्र चव्हाण झाले जागे
Santosh Masole
सन १९९१-९२ पासून 'अविरोध' या जिल्हा वृत्तपत्रातून पत्रकारितेचे धडे घेतले. १९९३ पासून 'आपला महाराष्ट्र' या जिल्हा दैनिकात प्रत्यक्ष वार्तांकनाला सुरुवात. देशदूत, सकाळ, गावकरी, लोकसत्ता, दिव्य मराठी या वृत्तपत्रांतून विविध ज्वलंत प्रश्नांवर लेखन. साप्ताहिक 'चित्रलेखा'तून लेखन, आकाशवाणी धुळे केंद्रावरून क्रीडा आणि ताज्या घटनांचा आढावा घेणाऱ्या कार्यक्रमांचे सादरीकरण आणि प्रक्षेपण, "लोकवृत्त"या धुळे जिल्ह्यातल्या अल्प काळात प्रशासन प्रिय झालेल्या जिल्हा वृत्त वाहिनीचे संस्थापक संचालक. वृत्तपत्रांतून सहकारातील दूध संघांची वाताहात, आदिवासी दुर्गम भागातून होणारी सागवानी लाकडाची तस्करी, परिवहन महामंडळातील प्रशासकीय अंदाधुंदी, न्यायालयीन कामकाज आणि कायदा सुव्यवस्थेतील प्रासंगिक स्थिती यावर परखड भाष्य अशा विविध विषयांवर प्रकाशझोत. सहकारातील भ्रष्ट कारभार पुराव्यासह चव्हाट्यावर आणण्याचे प्रयत्न.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here