Twitter : @maharashtracity

मुंबई: एका ७१ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने अवयवदान केल्याने मुंबईतील हे यावर्षीचे सोळावे अवयवदान ठरले आहे. मुंबई विभागीय अवयवदान व प्रत्यारोपण समितीकडून सांगितल्याप्रमाणे पवई येथील डॉ. एल एच हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये एका ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला काही कारणास्तव दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यावर उपचार केले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मेंदू मृत घोषित केले. डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबियांचे अवयवदानासाठी समुपदेशन केले. यामुळे अवयवदान करण्यात आले. या अवयवदानातून तीन जणांचे जीव वाचले आहेत.

समुपदेशनानंतर नातेवाईकांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, एकूण दोन मूत्रपिंड तसेच यकृत दान करण्यात आले. या दानामुळे एकूण तीन जणांना जीवदान मिळणार आहे. हे अवयवदान झेडटीसीसीच्या मार्गदर्शक सुचनांनुसार केले गेले असल्याचे समन्वयकांनी सांगितले. दरम्यान, मुंबईकरांनी जास्तीत जास्त अवयवदान चळवळीत सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here