Twitter : @maharashtracity

मुंबई: मुंबई महानगरातील ‘एम पूर्व’ विभागातील गौतमनगर, पांजरापोळ, ओम गणेश नगर, राहुल नगर, नागाबाबा नगर, सह्याद्री नगर, अशोक नगर, भारत नगर, बंजारा तांडा, हशू अडवाणी नगर, रायगड चाळ, विष्णू नगर, भीमटेकडी, भारत नगर, वाशी नाका या ठिकाणच्या टेकडीच्या, डोंगराच्या उतारावर वसलेल्या झोपडपट्टीवासियांना मुंबई महापालिकेकडून धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. महापालिकेने आवाहन केले आहे की, पावसाळ्यादरम्यान जोराच्या पावसाने दरडी कोसळण्याची, तसेच पावसामुळे डोंगरावरुन वाहत येणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे भूस्खलन होण्याची शक्यता असते. या भूस्खलनामुळे घरांची पडझड होण्याची शक्यता असते. त्यामुळे या भागातील धोकादायक इमारतींना, झोपड्यांना ‘एम पूर्व’ विभाग कार्यालयातर्फे सावधगिरीच्या व सावधानतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

‘एम पूर्व’ विभागांतर्गत झोपड्यातील, इमारतीतील रहिवाश्यांनी स्वतःहून सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे. नैसर्गिक आपत्तीने कोणत्याही प्रकारची दुर्घटना अथवा जीवित अथवा वित्तहानी झाल्यास बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही, असे सहाय्यक आयुक्त ‘एम पूर्व’ विभाग यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here