Twitter : @maharashtracity

मुंबई: जी-२० देशांच्या ‘आपत्ती जोखीम सौम्यीकरण’ कार्यगटाची दुसरी बैठक मुंबईत सुरू आहे. या बैठकीच्या ठिकाणी, वांद्रे-कुर्ला संकुलातील जीओ सेंटर येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात माहिती देणारे विशेष छायाचित्र प्रदर्शन भरवले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. (श्रीमती) भारती पवार यांच्या हस्ते झाले.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संचालक (आपत्ती व्यवस्थापन) महेश नार्वेकर, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे संचालक अप्पासो धूलज, जी-२० (राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) संचालक मृणालिनी श्रीवास्तव, यूनिसेफ इंडियाचे आणीबाणीविषयक प्रमुख (डीआरआर) टॉम व्हाईट, यूनिसेफ इंडियाचे सामाजिक धोरणे प्रमुख ह्यून ही बॅन यांची यावेळी उपस्थिती होती.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध उपक्रमांची सचित्र माहिती या प्रदर्शनामध्ये देण्यात आली आहे. मुंबई किनारी रस्ता प्रकल्प, उदंचन केंद्र, विविध जलस्त्रोत, मुंबई अग्निशमन दल, आपत्कालीन व्यवस्थापन विभाग, रस्ते, पूल यांच्यासह वेगवेगळ्या प्रकल्पांच्या माहितींचा समावेश आहे. विविध नैसर्गिक आणि मानवनिर्मिती आपत्तीविषयक माहिती देणारे, जनजागृती करणारी छायाचित्रं देखील यामध्ये प्रदर्शित करण्यात आली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here