X : @Rav2Sachin

मुंबई: सेवा ज्येष्ठतानुसार मिळणाऱ्या पदोन्नती संदर्भातील नियम बदलण्यासाठी आम्ही न्यायालयात धाव घेतलेली नाही. त्यामुळे आम्हाला आमच्या हक्काचे सेवा ज्येष्ठतानुसार मिळणारी पदोन्नती देण्यात यावी, अशी मागणी सहाय्यक अभियंतांनी केली आहे. यातील कित्येक अभियंता येत्या वर्षभरात निवृत्त होणारे आहेत.

दरम्यान, सेवा ज्येष्ठतानुसार पदोन्नती न मिळाल्याने जर कोणी नैराश्यातून आत्महत्या केली तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल विचारला जात आहे.

मुंबई महापालिकेत सुमारे 3500 च्या आसपास अभियंता आहेत. यामध्ये पदवीधारक आणि पदविका अभियंता कार्यरत आहेत. मागील वर्षी कित्येक अभियंता निवृत्त झाले. तर वर्षभरात आणि येत्या 2025 यावर्षी कित्येक अभियंता सेवानिवृत्त होणार आहेत. सेवानिवृत्त अभियंतांची आकडेवारी सुमारे 40 टक्के सांगितली जात आहे. त्यामुळे कित्येक अभियंतांना सेवा ज्येष्ठतानुसार पदोन्नती मिळणार आहे. तसेच महापालिकेला येत्या वर्षभरात अभियंता पदाची भरती करणे ही आवश्यक आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे तूर्तास अभियंता पदाची भरती थांबविण्यात आली आहे. तर दुसरीकडे ज्येष्ठतानुसार कार्यकारी अभियंता पदोन्नती संदर्भात पदवीधारक आणि पदविका अभियंतांनी न्यायालयात धाव घेतली असल्याने पदोन्नती प्रकरण प्रलंबित ठेवण्यात आले आहे.

महापालिकेत पदवीधारक आणि पदविका अभियंता कार्यरत आहेत. सेवा ज्येष्ठतानुसार पदोन्नती देताना पदवीधारक अभियंता जागेवर पदवीधारक अभियंताची नियुक्ती केली जाते. याच पद्धतीने पदविका अभियंताच्या जागेवर पदविका अभियंताची नियुक्ती केली जाते. असा सेवा ज्येष्ठतानुसार अभियंताना मिळणाऱ्या पदोन्नती संदर्भात पालिकेचा नियम असल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

पालिकेत पूर्वीपासून पदवीधारक अभियंतापेक्षा पदविकाधारक अभियंताची संख्या जास्त आहे. त्यामुळे पदविकाधारक अभियंताना सेवाज्येष्ठता मिळणारी पदोन्नतीची संख्या जास्त आहे. यावर पदवीधारक अभियंतांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे पालिकेने पदवीधारक आणि पदविका अभियंतांना एकत्रित करुन त्यांना पदोन्नती देण्याचा नियम केला. पण पदविका अभियंतांची निवृत्त होणारी संख्या जास्त असल्याने सेवा ज्येष्ठतानुसार पदविका अभियंतांनाच पदोन्नती जास्त मिळत असल्याने पदवीधारक अभियंतांनी पुन्हा आक्षेप घेतला. यावर पालिकेने पुन्हा एक नियम तयार केला. पदवीधारक अभियंतांना 67 जागा तर पदविका अभियंत्यांना 33 जागा प्रमाणे सेवा ज्येष्ठतानुसार पदोन्नती देण्याचा नियम आखला. पण या नियमावलीवर कोणाचे समाधान न झाल्याने मागील एक वर्षांपासून सेवा ज्येष्ठतानुसार पदोन्नती मिळण्याचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे, असे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, मागील वर्षभरात कित्येक सहाय्यक अभियंतांना ज्येष्ठतानुसार मिळणाऱ्या कार्यकारी अभियंता पदोन्नतीपासून मुकावे लागले. ‘मागील वर्षी आमच्यातील कित्येक सहाय्यक अभियंता सेवानिवृत्त झाले. न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याने त्यांना सेवा ज्येष्ठतानुसार मिळणाऱ्या कार्यकारी अभियंता पदोन्नती पासून मुकावे लागले’, असे सद्य स्थितीत काम करणाऱ्या सहाय्यक अभियंतांनी सांगितले.

‘आम्ही ही आता वर्षभरात निवृत्त होणार आहोत. मात्र आम्ही सेवा ज्येष्ठतेनुसार मिळणाऱ्या पदोन्नतीच्या नियमाविरोधात न्यायालयात धाव घेतलेली नाही. जर काहीजण न्यायालयात गेले असतील तर त्यात आमचा काही दोष नाही. कित्येक वर्ष सेवा केल्यावर सेवा ज्येष्ठतानुसार पदोन्नती दिली जाते. हा आम्हा कामगार आणि अभियंतांचा हक्क आहे. आमच्यातील कित्येकजण हे येत्या वर्षभरात निवृत्त होणार आहे. त्यामुळे कार्यकारी अभियंतापदी पदोन्नती संदर्भात न्यायालयीन निकाल जोवर लागत नाही तोवर कोणत्याही सहाय्यक अभियंता पदी काम करणाऱ्या अभियंतांना सेवा ज्येष्ठतानुसार पदोन्नती देता येणार नाही, असे महापालिकेचे म्हणणे योग्य नसल्याचे त्यांनी  सांगितले.

त्यामुळे आम्ही सहाय्यक अभियंता येत्या वर्षभरात निवृत्त होणार असल्याने पालिकेने आम्हाला न्याय देऊन आमच्या हक्काचे सेवा ज्येष्ठता नुसार पदोन्नती द्यावी, अशी मागणी सहाय्यक अभियंतांनी केली आहे.

Also Read: MAHARASHTRA.CITY च्या बातम्यांची दखल घेतली उपायुक्तांनी; अग्निशमन दलाकडून मागितला अहवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here