X : @Rav2Sachin

मुंबई: अग्निशमन दलाच्या संबंधितमहाराष्ट्र सिटी‘ (maharashtra.city) ने केलेल्या बातम्यांची दखल थेट मुंबई महापालिकेच्या उपायुक्तांनी घेत यासंदर्भात अग्निशमन दलाकडून अहवाल मागितला आहे. 

मागील वर्षी मुंबई अग्निशमन दलाच्या सर्वात मोठ्या भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना कामावर हजर राहूनही प्रशिक्षण भत्ता आणि वेतनही मिळालेले नाही, अशी धक्कादायक माहिती महाराष्ट्र सिटी ने उजेडात आणली. 

प्रत्येक उमेदवाराला प्रशिक्षण भत्ता 3 हजार रुपये महिना आहे. एका उमेदवाराचा  6 महिन्याचा प्रशिक्षण भत्ता 18 हजार रुपये आहे. मात्र पहिल्या टप्प्यातील आणि दुसऱ्या टप्प्यातील एकाही उमेदवाराला प्रशिक्षण भत्ता मिळालेला नाही. तसेच 37 दिवस उलटूनही त्यांना वेतन देण्यात आलेले नाही. नवीन भरती झालेल्या उमेदवारांना 40 हजार रुपये वेतन आहे. त्यामुळे फेब्रुवारी 2024 च्या पूर्ण महिन्याचे 40 हजार रुपये वेतन आणि जानेवारी 2024 महिन्यातील 9 दिवसांचे 12 हजार रुपये वेतन त्यांना मिळालेले नाही. या प्रकरणाची बातमी महाराष्ट्र सिटी ने “अग्निशमन दलाच्या नव्या भरतीच्या जवानांना ना भत्ता ना वेतन” या मथळ्याखाली प्रकाशित केली होती.

तांत्रिक ज्ञान नसलेला उपप्रमुख अग्निशमन अधिकारी सांभाळतो वाहनांची जबाबदारी!”  या मथळ्याखली प्रकाशित केलेल्या बातमीद्वारे अग्निशमन दलाचे वाहने व्यवस्थित न पडताळल्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडून मुंबईकरांच्या जीवाला धोका ही होऊ शकतो, ही बाब उजेडात आणली होती. अग्निशमन दलातील सर्व वाहनांची जबाबदारी उपप्रमुख अधिकारी (तांत्रिक) यांच्यावर होती. हे पद अभियंताचे हक्काचे असले तरी २०२१ पासून उपप्रमुख अधिकारी (तांत्रिक) या पदावर अभियंतांची नियुक्ती न करता यांत्रिकी आणि मोटार मॅकेनिकलचे कोणतेही ज्ञान नसलेल्या उपप्रमुख अग्निशमन अधिकारी यांना वाहन खरेदी करण्यासाठी परदेशात पाठवले जात आहे. सोबत अग्निशमन दलाच्या प्रत्येक वाहनांची जबाबदारी देण्यात आलेली आहे.

त्यामुळे येणाऱ्या काळात कोट्यवधी रुपये खर्च करुन खरेदी केलेली वाहने अकार्यक्षम निघाली तर त्याला जबाबदार कोण? ही वाहने व्यवस्थित न पडताळल्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडून मुंबईकरांच्या जीवाला धोका ही होऊ शकतो, अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केल्याचे नमूद केले.

तर कामगार – अभियंतांच्या रिक्त जागा न भरता आणि आहे त्या कामगारांच्या हाताला कामही न देता ठेकेदारांकडून वाहनांची दुरुस्ती केली जात आहे. अग्निशमन दलात असा अजब कारभार सुरु असला तरी गेल्या 10 ते 12 वर्षांपासून कामगार आणि अभियंतांच्या रिक्त जागा भरण्यात आल्या नाहीत. हे प्रकरण महाराष्ट्र सिटी ने “कामगार आणि अभियंतांच्या भरतीकडे कानाडोळा”  या मथळ्याखाली प्रकाशित केलेल्या बातमीतून उजेडात आणले. 

यासर्व बातम्यांची दखल महानगरपालिका उप आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी घेत यासंदर्भात अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर यांच्याकडून अहवाल मागितला आहे.

Also Read  https://www.maharashtra.city/cities/mumbai/bmc-no-allowance-or-salary-for-new-recruits-of-the-fire-brigade/

Also Read  https://www.maharashtra.city/breaking-news/mumbai-news-non-technical-deputy-chief-fire-officer-is-in-charge-of-the-vehicles/

Also Read  https://www.maharashtra.city/cities/mumbai/focus-on-recruitment-of-workers-and-engineers/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here