Twitter : @maharashtracity
मुंबई: राजावाडी रुग्णालयात नव्याने बांधलेल्या आरएमओ हॉस्टिलमधील निवासी डॉक्टर पाणी टंचाईने त्रस्त झाले आहेत. त्या बाबतची तक्रार रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना करण्यात आली आहे. मात्र गेल्या वीस दिवसांपासून पाणी टंचाईला तोंड देताना या डॉक्टरांच्या तोंडची पाणी पळाले आहे.
राजावाडी रुग्णालय परिसरात नवे आरएमओ हॉस्टेल बांधण्यात आले आहे. त्या ठिकाणी डॉक्टरांना स्थलांतरीत करण्यात आले. मात्र येथील पाण्याची अडचण पाहून डॉक्टरांनी वैद्यकीय आधीक्षकांना पत्र लिहून कळवले आहे. हे सर्व कनिष्ठ डॉक्टर असून राजावाडी रुग्णालयात विविध विभागांमध्ये काम करतात. पाण्याची समस्या सुरुवातील हॉस्टेलमधील अधिकाऱ्यांना सांगण्यात आली. मात्र स्थिती जैसे थे अवस्थेत असल्याने वैद्यकीय आधीक्षकांना यांना पत्र लिहिण्यात आले. तसेच ओपीडी आणि शस्त्रक्रिया विभागात अस्वच्छता पसरण्यामागील कारण ही पाण्याचा तुटवडा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.