राष्ट्रपतींचे गुणोत्कृष्ठ सेवेसाठी अग्निशमन सेवा पदक आणि शौर्य पदक 

By Sachin Unhalekar 

Twitter: @Rav2Sachin

मुंबई : मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी यांना राष्ट्रपतींचे गुणोत्कृष्ठ सेवेसाठी अग्निशमन सेवा पदक आणि शौर्य पदक प्रदान केले जाणार आहे.

येत्या १४ एप्रिल २०२३ रोजी मलबारहिल येथील राजभवनाच्या सभागृहात राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रपतींचे गुणोत्कृष्ठ सेवेसाठी अग्निशमन सेवा पदक आणि नागपूर येथील नॅशनल फायर सर्विस कॉलेजमध्ये येत्या १७ एप्रिल रोजी केंद्रीय गृह राज्यमंत्री यांच्या हस्ते राष्ट्रपतींचे शौर्य पदक मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी (Fire Brigade officer of BMC) आणि कर्मचारी यांना प्रदान करण्यात येणार आहे.

राष्ट्रपतींचे गुणोत्कृष्ठ सेवेसाठी अग्निशमन सेवा पदक हे प्रमुख अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर, उपप्रमुख अग्निशमन अधिकारी यशवंत जाधव,  माजी प्रमुख अग्निशमन अधिकारी कैलाश हिवराळे, माजी उपप्रमुख अग्निशमन अधिकारी विजयकुमार पाणीगृह, प्रमुख अग्निशामक सुरेश पाटील आणि संजय म्हामुनणकर यांना प्रदान करण्यात येणार आहे.

फोर्ट परिसरात भानुशाली इमारती कोसळली आणि या दुर्घटनेत शौर्य कामगिरी करणारे माजी प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे, प्रमुख अग्निशमन अधिकारी हेमंत परब, विभागीय अग्निशमन अधिकारी आत्माराम मिश्रा, विभागीय अग्निशमन अधिकारी के. आर. यादव यांना राष्ट्रपतींचे शौर्य पदक बहाल केले जाणार आहे.

तसेच कस्तुरबा रुग्णालयातील गॅस गळती (gas leakage in Kasturba hospital)  दुर्घटनेत उत्तम कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपतींचे शौर्य पदक विभागीय अग्निशमन अधिकारी किशोर घाडीगांवकर, केंद्र अधिकारी सागर खोपडे, वरिष्ठ केंद्र अधिकारी विशाल विश्वासराव, केंद्र अधिकारी दीपक जाधव, प्रमुख अग्निशामक संजय गायकवाड आणि अग्निशामक गणेश चौधरी, संजय निकम यांना प्रदान केले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here