राज्यात ९१९ रुग्णांची नोंद

Twitter: @maharashtracity

मुंबई: राज्यात मंगळवारी ९१९ नवीन कोरोना रुग्ण आढळून आल्याने राज्यातील कोविड रुग्णसंख्या (Covid patients) पुन्हा हजारच्या उंबरठ्यावर असल्याचे दिसून आले. तसेच एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला आहे. ज्यामुळे सध्या राज्यातील मृत्युदर १.८२ टक्के आहे. 

राज्यात ७१० रुग्ण बरे होवून घरी गेले असून आजपर्यंत ७९,९७,८४० कोरोना बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१२ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,६७,२३,७०७ प्रयोगशाळा नमुन्यापैकी ८१,५१,१७६(०९.४०टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४८७५ कोरोना रुग्ण सक्रिय असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, सध्याच्या कोविड संदर्भातील आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या सूचनेनुसार डिसेंबर महिन्यापासून राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. यामध्ये सर्व प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत असून २ टक्के प्रवाशांचे नमुने कोविडसाठी घेण्यात येत आहेत. यापैकी कोविड बाधित आलेला प्रत्येक नमुना जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात येत आहे. 

मंगळवारी सकाळपर्यंत विमानतळावरील या तपासणीचा तपशील याप्रमाणे : एकूण १७,८५,७०० आलेले प्रवासी असून ३९,९३१ एवढ्या प्रवाशांची आरटीपीसीआर केली आहे. तर ६६ जणांचे नमुने आरटीपीसीआर (RTPCR test) आणि जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

मुंबईत २४२ रुग्ण

मंगळवारी कोरोनाचे २४२ रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत मुंबईत ११,५८,३०२ रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत मुंबईत १९,७५० रुग्णांचा मृत्यु झाला आहे. याशिवाय मुंबईत आजघडीला १,४७८ सक्रिय रुग्णसंख्या असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here