नियंत्रण मिळाले खरे पण दोन गॅस सिलेंडरच्या स्फोटाने पुन्हा आग भडकली

By Sachin Unhalekar

Twitter: @Rav2Sachin

मुंबई: ब्रीच कँडी येथील ब्रीच कँडी या १४ मजली अपार्टमेंटच्या 12 व्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 1201 मध्ये आग लागल्याची घटना शनिवारी रात्री 10 च्या सुमारास घडली. आगीवर एका तासात अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले खरे पण फ्लॅटमध्ये दोन गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग सर्वत्र पसरली आणि आगीवर पहाटे 3 च्या सुमारास नियंत्रण मिळवता आले. सुदैवाने दुर्घटनेत कोणीही जखमी वा जीवितहानी झाली नाही.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाने 60 मीटर लॅडर मशीनचा वापर केला होता. गवालीया टॅंक फायर स्थानकाचे वरिष्ठ अग्निशमन अधिकारी रोहन मोरे हे स्वतः लॅडर मशीनमध्ये बसून 12 व्या मजल्यावरील आगीच्या ठिकाणी पाण्याचा फवारा मारत आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत होते. तसेच काही जवान व अधिकारी यांनी हातात हॉर्स पाईप घेऊन 12 व्या मजल्यापर्यंत चालत जाऊन त्यांनी आग विझविण्यास प्रयत्न केले. यामुळे आग एक तासात नियंत्रणात आली खरी पण त्याच वेळी फ्लॅटमधील दोन गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आणि आग सर्वत्र पसरली.

आग एक तासात नियंत्रणात आली होती. त्याच आगीवर नियंत्रण मिळविण्यास पहाटे तीन वाजले. सुदैवाने आगीत कोणीही जखमी वा जीवितहानी झाली नाही. शॉर्ट सर्किटने आग लागल्याचे सांगितले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here