Twitter: @maharashtracity

मुंबई: एका ४४ वर्षाच्या पुरुषाने अवयवदान केल्याने पाच जणांना जीवनदान मिळाले. यंदाचे मुंबईतील हे एकोणीसावे अवयवदान ठरले आहे. मुंबई विभागीय अवयवदान व प्रत्यारोपण समितीकडून सांगितल्याप्रमाणे अंधेरी येथील कोकीलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये एका ४४ वर्षीय नागरिकाला काही कारणास्तव दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यावर उपचार केले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मेंदू मृत घोषित केले. डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबियांचे अवयवदानासाठी समुपदेशन केले. समुपदेशनानंतर नातेवाईकांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, त्याचे फुप्फुसे, यकृत, स्वादूपिंड तसेच दोन्ही मूत्रपिंड दान करण्यात आले. या दानामुळे पाच जणांना जीवदान मिळणार आहे. हे अवयवदान झेडटीसीसीच्या मार्गदर्शक सुचनांनुसार केले गेले असल्याचे समन्वयकांनी सांगितले. दरम्यान, मुंबईकरांनी जास्तीत जास्त अवयवदान चळवळीत सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here