Twitter: @maharashtracity

मुंबई: मुंबईत शनिवारी १० जून रोजी बाई जेरबाई वाडिया हॉस्पटलमध्ये विशेष अवयवदान झाले. यात ३ वर्ष ४ महिने वयाच्या बाळाकडून अवयवदान करण्यात आले. कमी वयाचे अवयवदाते फार कमी संख्येने मिळत असून यात या लहान वयातील अवयवदात्याची भर पडली. यापूर्वी २००१ आणि २०१९ मध्ये लहान अवयवदात्याकडून अवयवदान झाले होते. दरम्यान, शनिवारचे मुंबईतील या वर्षाचे २० वे अवयवदान ठरले.

विभागीय अवयवदान आणि प्रत्यारोपण समिती मुंबईकडून सांगितल्याप्रमाणे हे बाळ तीन वर्षे ४ महिन्याचे होते. याचे हृदय, यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान करण्यात आले. यामुळे चार जणांना जीवनदान मिळाले. बाळाच्या पालकांना अवयवदानाचे महत्व सांगितल्यावर त्यांनी अवयवदानाला परवानगी दिली. झेडटीसीसीच्या नियमाप्रमाणे हे अवयवदान करण्यात आले असल्याचे समितीकडून सांगण्यात आले.

लहान वयातील अवयवदान कमी संख्येने आणि क्वचित होत असतता. यापूर्वी २००१ च्या मे महिन्यात १८ महिन्याच्या बाळाचे तर २०१९ या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात २ वर्षे २ महिने वयाच्या बाळाकडून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये अवयवदान करण्यात आले असल्याची माहिती समितीकडून देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here