वाऱ्याचा वेग ५० ते ६० प्रतितास प्रति किमी
Twitter: @maharashtracity
मुंबई: मुंबईत सोमवारी वाऱ्याचा वेग वाढला होता. शनिवारपासून मुंबईत वाऱ्यांच्या वेगाला सुरुवात झाली असून मुंबईत सोमवारी वाऱ्याचा वेग ५० ते ६० प्रतितास प्रति किमी असा होता. यामुळे शहरातील झाडे, बॅनर्स सहित काही गोष्टींवर परिणाम झाला. दरम्यान, मुंबई शहराला येलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे. हा सर्व बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम असल्याचे हवामानशास्त्र विभागाकडून सांगण्यात आले.
वाऱ्याचा हाच वेग आगामी २४ तासात ५० ते ५५ प्रतितास प्रति किमी असा होण्याची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यात येलो अलर्ट दिला असून काही भागात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली. त्याप्रमाणे बोरिवली, गोरेगाव या ठिकाणी पाऊस झाला. मात्र पूर्व उपनगरे तुलनेने कोरडी होते.
कमाल तापमान घसरले
दरम्यान, रविवारी मुंबईतील कमाल तापमानाने ३८ डिग्री सेल्सिअस पर्यंत उसळी घेतली होती. सोमवारी मात्र तापमान दोन डिग्री सेल्सिअसने घसरले होते. मुंबई शहरात ३३.४ उपनगरात ३६.८ डिग्री सेल्सिअस एवढे तापमान नोंदविण्यात आले.