झाड कोसळून एक जण जखमी

Twitter : @maharashtracity

मुंबई


मुंबई महानगरपालिकेच्या स्वयंचलित पर्जन्यमान केंद्रांवरील नोंदीप्रमाणे शुक्रवारी शहरात १२.४६, पूर्व उपनगरात ३३.०२ तर पश्चिम उपनगरात २६.०४ मिमी अशी पावसाची नोंद करण्यात आली. तर दिवसभरात कुलाबा येथे २.० तर सांताक्रुझ येथे ३६.३ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली. दरम्यान, कांदिवलीत रिक्षावर झाड कोसळल्याने एकजण जखमी झाला.

दुपारनंतर पावसाने वेग घेत मुंबईत सर्वदूर पावसाला सुरुवात झाली. आज मुंबई शहरात व उपनगरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे. तसेच एक – दोन ठिकाणी जोरदार सरीची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान, शुक्रवारी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकूण १२ झाडे किंवा फांद्या पडण्याच्या तक्रारी करण्यात आल्या. यात एक जण जखमी झाला. तर घरे किंवा भिंती पडझडीच्या एकूण तीन तक्रारी करण्यात आल्या. शिवाय एकूण ५ शॉर्टसर्किटच्या तक्रारी करण्यात आल्या असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

झाड कोसळून एक व्यक्ती जखमी :

पालिकेच्या अग्निशमन नियंत्रण कक्षाकडून दिलेल्या माहिती प्रमाणे कांदिवली पश्चिमेला इराणवाडी येथे एशियन बेकरी जवळ झाड रिक्षावर कोसळल्याने एक व्यक्ती जखमी झाला. या व्यक्तीचे नाव मंगेश सुर्वे (४५) असून त्याला उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना घरी सोडण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here