Twitter : @maharashtracity

मुंबई


इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्याने डॉ. राजेंद्र ननावरे यांची आयएमएच्या शैक्षणिक विभाग श्रेणीतील पुरस्कार २०२३ साठी निवड केली आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार ८ जुलै २०२३ रोजी स्टर्लिंग हॉल, मीरा भाईंदर येथे होणार आहे. वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनात्मक केलेल्या कामगिरीबद्दल डॉ. ननावरे यांची निवड करण्यात आली असल्याचे आयएमएकडून सांगण्यात आले.


डॉ. राजेंद्र ननावरे हे गेली ३५ वर्षे शिवडी टीबी रुग्णालयात कार्यरत आहे. २०१६ मध्ये ते निवृत्त झाले. ते २०११ ते २०१५ पर्यंत वैद्यकीय अधीक्षक पदी कार्यरत होते. २०१६ ते १९ या कालावधीत जागतिक आरोग्य संघटनेची सिस्टर कन्सर्न छाती आणि क्षयाचे संशोधन कार्य करणाऱ्या संस्थेमध्ये आयसीएमआरच्यावतीने क्लिनिकल एक्सपर्ट म्हणून बेडाक्युलीनच्या पायलट प्रोजेक्टचे काम पाहत होते. तसेच २०१९ ते २१ या कालावधीत ओपीडी बेसिसवर १८०० रुग्णांना बेडाक्युलिन सुरु केले. त्यात गंभीर क्षय रुग्ण होते. आयसीएमआरमध्ये काम करत असताना ३ संशोधनात्मक लेख प्रसारीत करण्यात आले. तसेच दहा हून अधिक वेळा संशोधनात्मक लेख प्रसिद्ध झाले असल्याने या पुरस्कारासाठी डॉ. ननावरे यांची निवड करण्यात आली आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here