Twitter : @maharashtracity

मुंबई :

मुंबईत सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवसापासून ते १० सप्टेंबर पर्यंत मुंबईत इतर पावसाळी आजाराच्या तुलनेत हिवतापाचे सर्वाधिक म्हणजे ३९० रुग्ण आढळले. त्यामुळे मुंबईत मलेरियाचा ताप वाढला आहे. तर त्या पाठोपाठ डेंग्युचे रुग्ण आढळले असून तिसऱ्या क्रमांकावर गॅस्ट्रो रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून साप्ताहिक पावसाळी आजारांचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यात मलेरिया रुग्णवाढ दिसून आले असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, हिवताप ३९०, लेप्टो ३१, डेंग्यू ३५०, गॅस्ट्रो १९२, हेपेटायटीस २३, चिकनगुनिया १० तर एच१एन१ ५ एवढ्या रुग्णांची नोंद झाली आहे. यात लेप्टो, गॅस्ट्रो, हेपेटायटीस आणि एच१एन१च्या रुग्णसंख्येत घट झाली आहे. यावेळी रिपोटींग युनिटची संख्या २२ वरुन ८८० वर वाढवल्याने अहवालातील रुग्णसंख्येत वाढ दिसून येत आहे. आँगस्ट महिन्यात एकूण हिवतापाची रुग्णसंख्या १०८०, लेप्टो ३०१, डेंग्यू ९९९, गॅस्ट्रो ९७८, हेपेटायटीस १०३, चिकनगुनिया ३५ तर एच१एन१ ११६ एवढी होती. १ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत ४ लाख ९८ हजार ७५० तापग्रस्त रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यासाठी २४ लाख ९३ हजार ७५० लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here