सहा सह आयुक्तांसोबत दोन उपआयुक्तही निवृत्त होणार

By Sachin Unhalekar

Twitter: @Rav2Sachin

मुंबई: पुढील वर्षी २० टक्क्यांहून अधिक पालिका कर्मचारी – अधिकारी निवृत्त होणार आहेत. सध्या १ लाख ४४ हजार इतक्या मोठ्या प्रमाणात मनयुष्यबळ महापालिकेत आवश्यक असताना सध्या ९४ हजार इतक्या इतक्या कमी प्रमाणात मनयुष्यबळ कार्यरत आहे. त्यामुळे आधीच कमी मनुष्यबळात काम करणे अवघड झाले असताना पुढील वर्षी निवृत्त होणाऱ्या कामगार, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात संख्या असल्याने कामे कसे होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

ज्यांचे जन्म वर्ष १९६६ आहे असे पालिकेचे सर्व कामगार, कर्मचारी आणि अधिकारी सेवेतून निवृत्त होणार आहेत. यामध्ये पालिकेचे सहा सह आयुक्त सोबत दोन उपआयुक्त ही निवृत्त होणार आहेत. ही निवृत्त संख्या सुमारे २० टक्क्यांहून अधिक असल्याचे सांगितले जात आहे. 

वर्ष १९८६ आणि वर्ष १९९३ मध्ये मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणात भरती झाली होती. या भरतीत जन्म वर्ष १९६६ मधील उमेदवारांची संख्या ही जास्ती होती. महापालिकेत ५८ वर्ष हे निवृत्तीचे वय आहे. पुढील वर्षी जन्म वर्ष १९६६ मधील कर्मचारी, कामगार आणि अधिकारी हे सर्व ५८ वर्ष निवृत्तीच्या वयोमानानुसार निवृत्त होणार आहेत. यामध्ये मुंबई महापालिकेच्या सर्व खात्यातील कामगार, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

वर्ष २०२४ मध्ये कामगार आणि कर्मचाऱ्यांसोबत ६ सह आयुक्त आणि ३ उपआयुक्त निवृत्त होणार आहेत. सह आयुक्त (सुधार ) रमेश पवार, सह आयुक्त (महापालिका आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, सह आयुक्त (सामान्य प्रशासन ) मिलीन सावंत, सह आयुक्त (परिमंडळ ३) रणजीत ढाकणे, सह आयुक्त (करनिर्धारण व संकलन ) सुनील धामणे, सह आयुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) विजय बालमवार यांच्या सोबत उपआयुक्त (परिमंडळ ५ ) हर्षद काळे आणि उपआयुक्त ( परिमंडळ २) रमाकांत बिरादर निवृत्त होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here