By Sadanand Khopkar

Twitter: @maharashtracity

मुंबई: मुंबई येथील वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे कार्यालय नवी दिल्ली येथे हलवण्याचा कुठलाही निर्णय केंद्र सरकारने घेतलेला नाही, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज  विधानसभेत केले.

या विषयी निवेदन करतांना फडणवीस म्हणाले, वस्त्रोद्योग आयुक्त आणि पाच अधिकार्‍यांना दिल्ली येथे येण्यास सांगितले आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयाची फेरबांधणी आणि या क्षेत्राला अधिक चालना देण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. या आयुक्तालयात पाचशे अधिकारी आणि कर्मचारी आहेत. त्यामुळे संपूर्ण आयुक्तालय दिल्ली येथे हलवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला, असे म्हणणे चुकीचे आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here