@maharashtracity
मुंबई: राज्यात गुरुवारी १९८ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ८१,२३,४५३ झाली आहे. काल ३२८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७९,७२,५८० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१४ टक्के एवढे झाले आहे.
राज्यात आज रोजी एकूण २५२३ सक्रिय रुग्ण असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. तसेच राज्यात गुरुवारी १ कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,४८,९६,५२६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१,२३,४५३ (०९.५७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
मुंबईत ८० बाधित
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ८० एवढे रूग्ण आढळले. आता मुंबईत एकूण ११४९९८६ रुग्ण आढळले. तसेच १ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मुंबईतील एकूण मृत्यूची संख्या १९७३४ एवढी झाली आहे.