Twitter: @maharashtracity
मुंबई: मुंबईतील प्रसिद्ध मोझेक कलाकार (mosaic artist) नितीन कांबळे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तब्बल १० हजार ६०० तैल खडू (oil pestal) पासून ३ x २.५ फुटाचे पोट्रेट साकारले आहे. हे पोर्ट्रेट साकारून १३२ व्या जयंती निमीत्त त्याने घटनाकार बाबासाहेबांना अनोखी मानवंदना दिली आहे.
या आधी नितीन यांनी अनेक मोझेक पोट्रेट केले आहे. त्यातील एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोट्रेटची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि वर्ल्ड रेकॉर्डस इंडिया मध्ये झाली आहे. आता नितीन दुसऱ्या वर्ल्ड रेकॉर्डची नोंद महामानव डॉ बाबासाहे आंबेडकर यांचे तैल खडू (oil pestal ) चा वापर करून साकारलेल्या पोट्रेटची नोंद सुद्धा इंडिया बुक ऑफ रेकॉड मध्ये होणार आहे. या पोट्रेट साठी नितीन यांनी फक्त ५ रंग संगतीचा वापर केला आहे. हे पोट्रेट नितीनने फक्त एका दिवसात पूर्ण केलं आहे.