राज्यात १११५ नवे रुग्ण

Twitter: @maharashtracity

मुंबई: राज्यात बुधवारी १११५ नवीन कोरोना रुग्ण आढळून आल्याने राज्यातील कोविड रुग्णसंख्या हजार पार झाल्याचे समोर आले. तर ९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाल्याने चिंता वाढली आहे. ज्यामुळे सध्या राज्यातील मृत्युदर १.८२ टक्के आहे. 

राज्यात ५६० रुग्ण बरे होवून घरी गेले असून आजपर्यंत ७९,९८,४०० कोरोना बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,६७,४०,१४६ प्रयोगशाळा नमुन्यापैकी ८१,५२,२९१(०९.४०टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५४२१ रुग्ण सक्रिय असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, सध्याच्या कोविड संदर्भातील आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या पार्श्वभुमीवर भारत सरकारच्या सूचनेनुसार डिसेंबर महिन्यापासून राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. यामध्ये सर्व प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत असून २ टक्के प्रवाशांचे नमुने कोविडसाठी घेण्यात येत आहेत. यापैकी कोविड बाधित आलेला प्रत्येक नमुना जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात येत आहे. 

मंगळवारी सकाळपर्यंत विमानतळावरील या तपासणीचा तपशील याप्रमाणे : एकूण १७,९७,५३९ आलेले प्रवासी असून ४०,२५० एवढ्या प्रवाशांची आरटीपीसीआर केली आहे. तर ६७ जणांचे नमुने आरटीपीसीआर आणि जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

मुंबईत ३२० रुग्ण

मुंबईत बुधवारी ३२० कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत मुंबईत ११,५८,६२२ रुग्ण आढळले असून आतापर्यंत मुंबईत १९,७५२ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. याशिवाय मुंबईत आजघडीला १,५७७ सक्रिय रुग्णसंख्या असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here