Twitter : @maharashtracity

मुंबई: मुंबईसह राज्यात मंगळवारी मुसळधार पाऊस होणार असा अंदाज सोमवारी देण्यात आला होता. मात्र इशाऱ्याप्रमाणे मुंबईत पाऊस झाला नाही. पालिकेच्या स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्रांवरील नोंदीप्रमाणे शहरात ३.६, पूर्व उपनगरात २३.६० तर पश्चिम उपनगरात २२.११ मिमी अशी पावसाची नोंद झाली.

मुंबई तसेच उपनगरांत मंगळवारी पावसाचा वेग घटल्याचे चित्र होते. उपनगरात सायंकाळी साडेपाच पर्यंत ३१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तसेच साडेपाच पर्यंतच्या तीन तासात २३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तुलनेने शहरात पावसाचा वेग कमी होता. कुलाबा वेधशाळेने ११ मिमी पावसाची नोंद केली आहे. आता मात्र नैऋत्य मोसमी वाऱ्याने राज्य व्यापले असल्याने पावसाचा जोर दिसून येत आहे. मुंबईसह ठाणे, रायगड, कोकण, तसेच पालघर अशा एमएमआर रिजनमध्ये दिवसभर असून नसून पावसाची नोंद झाली. परिसरातील तापमान घटल्याने गारवा वाटू लागला आहे.

इशारा :  
दरम्यान सायंकाळी पाचनंतर हवामानशास्त्र विभागाने आगामी तीन ते चार तासासाठी इशारा दिला.

तक्रारी :
मुंबईत मंगळवारी दिवसभरात एकूण ११ झाडे किंवा फांद्या पडण्याच्या तक्रारी करण्यात आल्या. तर शहरात ३ शॉर्टसर्किट होण्याच्या घटना घडल्या. तसेच एकूण ३ ठिकाणी घरांची पडझड झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. शहरात वाहतूक मात्र सुरळीत सुरु होती.

सकाळी ८.३० पर्यंत तलाव परिसरातील पाऊस नोंद

तलाव                         पाऊस मिमीमध्ये
वैतरणा                      ९३
तानसा                      ६६
विहार                      ७८
तुळशी                     ११६
अप्पर वैतरणा            २३
भातसा                    ७५
मध्य वैतरणा              ४२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here