Twitter : @Rav2Sachin

मुंबई

अग्नीशमन दलाच्या ऑनलाइन सेवा पद्धतीने ना – हरकत प्रमाणपत्र देण्याच्या कामात संगणकीय पद्धतीने निवड (randomization) १ ऑगस्ट पासून सुरु करण्यात आले असून यामुळे ना – हरकत (एनओसी) प्रमाणपत्र देण्याचे काम जलद गतीने होणार आहे.

गेल्या तीन वर्षापासून ऑनलाईन सेवा पदधतीने अग्निशमन दलातर्फे ना – हरकत प्रमाणपत्र देण्याचे काम सुरु असून हे अधिक काम जलद गतीने करण्यासाठी randomization सुरू करण्यात आले आहे.

मुंबईत काही विभागात इमारतींचे बांधकाम जास्त प्रमाणात तर काही ठिकाणी कमी प्रमाणात सुरू आहेत. यामुळे जास्त बांधकाम असलेल्या ठिकाणीच अग्निशमन अधिकाऱ्यांना ना – हरकत प्रमाणपत्र देण्यासंबंधीचे काम मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांच्यावर कामाचा भार वाढून येथील कामाला वेळ लागत होता. तर जिथे इमारती बांधकामाचे काम कमी प्रमाणात होते, तिथे ना – हरकत प्रमाणपत्र देण्याचे काम अग्निशमन अधिकाऱ्यांना कमी होते.

हे लक्षात घेऊन ऑनलाईन सेवा पद्धतीने ना – हरकत प्रमाणपत्र देण्याचे काम अधिक जलद गतीने करण्यासाठी यादृच्छिकीकरण (randomization) करण्यात आले आहे. यादृच्छिकीकरणात (randomization) शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगर असे तीन विभाग करण्यात आलेले आहे.

यामध्ये शहराच्या एखाद्या ठिकाणी इमारतीच्या बांधकामाच्या परवानगी संबंधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज अग्निशमन विभागाकडे केला असता तो ऑनलाईन अर्ज हा त्या विभागातील अग्निशमन अधिकाऱ्यांना न जाता तो अर्ज हा शहराच्या ज्या ठिकाणी एनओसीचे काम कमी असेल त्या अधिकाऱ्याकडे जाऊन त्यावर कार्यवाही होणार आहे.

अशा पद्धतीने पूर्व आणि पश्चिम उपनगरात कामाचे समान वाटप होणार आहे. जेणेकरून एनओसीचे काम जलद गतीने होण्यास मदत होणार असल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here