Twitter : @NalavadeAnant

मुंबई

कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या मृत्यूची सरकार चौकशी करणार तेव्हा रशेष शाह यांचा बोलविता “धनी” कोण? याही मुद्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार ॲड आश‍िष शेलार यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.

एका मराठी माणसाने मोठया धाडसाने बाजारात उपलब्ध असलेल्या सुविधेतून कायदेशीर प्रक्रिया करुन कर्ज घेतले. पण कायद्याचा गैरवापर करुन नितीन देसाई यांना अडचणीत आणण्यात आले का ? अशी शंकाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

रशेष शाह आणि एआरसी एडेलवाईज कंपनीचा ज्या पध्दतीचा रेकॉड आहे, त्याची कालपर्यंत आपल्याकडे दोन प्रकरणे आली होती. आता अजून काही प्रकरणे येऊ लागली आहेत. आता या कंपनीची चार प्रकरणे आपल्याकडे आली असून त्यामध्ये या कंपनीने योग्य कायद्याचा अयोग्य वापर करुन खाजगी सावकारी थाटली आहे. त्यामुळे या प्रकरणात रशेष शाह आणि एआरसी एडेलवाईज कंपनीचा हेतू काय होता ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

एका मराठी माणसाने उभा केलेला स्टुडिओ व त्याचा उद्योग गिळंकृत करण्याचा हेतू होता का? याची चौकशी करण्यात यावी. हा स्टुडिओ रशेष शहाकडून अन्य कोणी विकत घेणार होता का? याचीही चौकशी करण्याची गरज असल्याचे शेलार यांनी सांगितले.

त्या ग्राहकाच्या सांगण्यावरुनच नितीन देसाई यांच्यावर दबाव टाकण्यात येत होता का ? रशेष शाह यांचा बोलविता “धनी” कोण? या सगळयाची चौकशी सरकारने करावी, अशी मागणी करताना या प्रकरणाचा आपण पाठपुरावा करणार असल्याचेही शेलार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here