Twitter : @NalavadeAnant
मुंबई
उद्योग विभागाने काढलेली श्वेतपत्रिका ही राजकीय हेतूने प्रेरित ब्लॅक पत्रिका असून बेरोजगार तरुणांना फसविणारी व महाराष्ट्राच्या दृष्टीने कुचकामी ठरलेली आहे, अशी परखड टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शुक्रवारी सभागृहात बोलताना केली.
या श्वेत पत्रिकेत उद्योग विभागाने वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प, एअर बस प्रकल्प, सँफ्रन प्रकल्प, बल्क ड्रग पार्क प्रकल्प आदी प्रकल्प युती सरकारच्या काळात झाले नसल्याचे म्हणत माहविकास आघाडी सरकारच्या काळात हे प्रकल्प बाहेर गेल्याचे म्हटले. मात्र दानवे यांनी सरकारने केलेल्या आरोपांवर या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री यांनी केलेल्या घोषणांची तारीखनिहाय माहिती सभागृहात मांडत सरकारने केलेला आरोप खोडून तर काढले. राज्याबाहेर गेलेल्या उद्योग प्रकल्पांच्या परिस्थितीची सत्यता दानवे यांनी सभागृहात मांडली.