By Sadanand Khopkar

Twitter : @maharashtracity

मुंबई: आरेतील झोपडपट्टी धारकांना झोपडी दुरुस्ती तसेच लाईट मीटर बसविण्यासाठी परवानगी मिळावी व मयूर नगर येथील अन्यायकारक दुकानाच्या तोडक कारवाई विरोधात काँग्रेस नेते संजय निरुपम (Congress leader Sanjay Nirupam) यांच्या नेतृत्वाखाली आरे प्रशासना विरोधात उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा काँग्रेसच्यावतीने धडक मोर्चा काढण्यात आला. (Protest against Aarey administration by Congress)

काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आमची आरे प्रशासना विरोधातील लढाई न्याय मिळेपर्यंत सुरुच राहील. आरे प्रशासनाने मयूर नगर येथील औषधांची दुकाने व दवाखानासुध्दा तोडला. या विभागातील एकाही व्यक्तीचा दुर्देवी मुत्यु झाला तर त्याला जबाबदार म्हणून आरे सीईओवर गुन्हा दाखल करु. तसेच जोपर्यंत आरे सीईओ बरोबर आमची संयुक्त मिटींग होत नाही, तोपर्यंत तोडक कारवाई करु नये, अशा मागणी त्यांनी केली.

यावेळी आरेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चात काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्यासोबत माजी उपमहापौर राजेश शर्मा, जिल्हाध्यक्ष क्लाईव्ह डायस, मुंबई प्रदेश आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष सुनिल कुमरे, माजी नगरसेवक मोहसीन हैदर यांच्यासह मोठ्या संख्येने आरेतील रहिवासी व काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here