@maharashtracity

डेंग्यू,मलेरिया रुग्णांमध्ये दुपटीने वाढ

मुंबई: मुंबईत कोरोना (corona) आणि ओमीक्राॅनचे रूग्ण (Omicron patients) वाढत असतानाच साथीच्या आजारांचे रूग्ण (epidemics patients) संख्या ही वाढत असल्याचे महापालिका आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहिती वरून समजत आहे.

दिनांक २१ ते ३१ डिसेंबर २०२१ कालावधीत मलेरिया (malaria), डेंग्यूसह (Dengue), गॅस्ट्रोच्या (Gastro) रुग्ण संख्येत दुप्पट वाढ झाली असून सर्दी, खोकल्याच्या तक्रारीं करणारी रूग्ण संख्या ही वाढली आहे.

दरम्यान, गेल्या 10 दिवसांत म्हणजेच 21 ते 31 डिसेंबर महिन्यात मलेरियाचे 288, गॅस्ट्रोचे 433 तर डेंग्यूच्या 40 नवीन रुग्णांची नोंद झाल्याचे सांगण्यात आले. तर एच वन एन वन (H1N1)आजार आटोक्यात असून गेल्या 10 दिवसांत एकही स्वाईन फ्लूचा (Swine flu) रुग्ण आढळलेले नाही, असे पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, मुंबईत कोरोनाची तिसरी लाट धडकली असताना त्यात ओमायक्राॅन व्हेरियंट (Omicron variant) वेगाने पसरत आहे. यात सध्या साथीच्या आजारांचे आव्हान ही पालिकेच्या आरोग्य विभागाने स्वीकारले आहे.

तसेच मुंबईतील पालिकेच्या कान- नाक- घसा या रुग्णालयातील ओपीडी सध्या वाढली आहे. सर्दी, खोकल्यासह तापाचे रुग्ण वाढू लागले आहेत. दररोज किमान 350 च्या वर ओपीडीत रुग्ण दाखल होत असून सर्दीमुळे कानाचे विकार वाढले आहेत, अशी माहिती कान-नाक-घसा रुग्णालयाच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपिका राणा यांनी दिली आहे.

21 ते 31 डिसेंबर 2021 कालावधीत आढळलेले रुग्ण :

मलेरिया – 288
लेप्टोस्पायरोसिस- 4
गॅस्ट्रो – 433
डेंग्यू – 49
कावीळ – 37
चिकनगुनिया – 12
लेप्टो – 4
एच1एन1 – 0

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here