@maharashtracity

मुंबई: मुंबई परळ येथील लहान मुलांच्या बाई जेरबाई वाडिया या रुग्णालयाला अमेरिकन अॅक्रिडेशन कमिशन इंटरनॅशनल (एएसीआय) कडून मान्यता मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर या रुग्णालयाच्या कामाचा गौरव होऊन मानांकन मिळवण्यात वाडिया हे पहिले रुग्णालय ठरले आहे. या निमित्ताने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते वाडिया रुग्णालयाच्या सीईओ डॉ. मिनी बोधनवाला यांचा सत्कार करण्यात आला.

अमेरिकन अॅक्रेडिटेशन कमिशन इंटरनॅशनलने २५ ते २७ ऑगस्ट, २०२२ दरम्यान बाई जेरबाई वाडिया चिल्ड्रेन रुग्णालयात अमेरिकन अॅक्रिडिटेशन कमिशनचे पहिले आंतरराष्ट्रीय सर्वेक्षण पूर्ण केले. मुलांसाठी बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल हे एएसीआय अमेरिका आंतरराष्ट्रीय मानकांशी वचनबद्ध असलेले भारतातील पहिले रुग्णालय ठरले आहे.

या मान्यतेने रुग्णांना पुर्णवेळ उच्च दर्जाची सेवा आणि शुश्रुषा प्रदान करण्याच्या रुग्णालयाच्या प्रयत्नांचा यश मिळाले आहे. यावर वाडिया रुग्णालयाच्या सीईओ डॉ. मिनी बोधनवाला यांनी सांगितले की, रुग्णास उच्च दर्जाची प्राथमिक सेवा आणि सुविधा पुरवत उत्तमोत्तम वैद्यकिय सेवा पुरवण्याचे आमचे मुख्य उद्दीष्ट्य आहे. आमच्या रुग्णांच्या सर्वच गरजांना प्राधान्य देतो आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी कठोर परिश्रम घेतो. वाडिया रुग्णालयात रुग्ण-केंद्रित दृष्टीकोन असून एएसीआयद्वारे सूचित केलेल्या आंतरराष्ट्रीय मानकांची पूर्तता करते.

रुग्णालयाच्या प्रत्येक सदस्याचे कौतुक करायचे आहे, ज्यांनी हा एवढा लांबचा पल्ला गाठण्यात आपले योगदान दिले आहे. सुरक्षा, योग्य उपचार आणि सुविधा तसेच, रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांची काळजी हे आमचे मुख्य उद्देश्य आहे, असेही डॉ बोधनवाला म्हणाले.

तर एएसीआयचे संचालक आणि उपाध्यक्ष धीरज खतोरे यांनी सांगितले की, वाडिया रुग्णालयाने यशाचा मोठा पल्ला गाठला असून सर्व प्रकारच्या आपात्कालीन परिस्थितींना त्याच्या कौशल्याने, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने हाताळण्यासाठी हे रुग्णालय नेहमीच सज्ज असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here