@maharashtracity

मुंबई: मुंबईत ५६ वर्षीय महिलेकडून अवयवदान करण्यात आले. १६ ऑक्टोबर रोजी करण्यात आलेले हे अवयवदान यंदाचे मुंबईतील हे ३१वे अवयवदान ठरले आहे. गेल्या दहा महिन्यात मुंबईत अद्यापपर्यंत ३० अवयवदान करण्यात आले असल्याचे मुंबई विभागीय अवयवदान आणि प्रत्यारोपण समितीकडून सांगण्यात आले.

झेडटीसीसीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अवयवदान करण्यात आले. या महिलेचे दोन्ही मूत्रपिंड तसेच यकृत दान करण्यात आल्याने तिघांना जीवनदान मिळाले. दरम्यान दान करणाऱ्या व्यक्तीचे नातेवाईक अवयव दानाविषयी माहिती देण्यास तयार नसल्याचे झेडटीसीसीकडून सांगण्यात आले. ५६ वर्षीय महिलेच्या प्रकृती तक्रारीमुळे परेल येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्या व्यक्तीला मेंदूमृत घोषित करण्यात आले. त्यानंतर समुपदेशन केल्यानंतर नातेवाईकांनी या व्यक्तीचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला.

नातेवाईकांच्या निर्णयानंतर या व्यक्तीचे अवयव दान केले. या अवयव दानात दोन्ही मूत्रपिंड तसेच यकृत दान करण्यात आले. या अवयवदानामुळे गेल्या काही दिवसांपासून अवयवांच्या प्रतिक्षेत असणाऱ्या तीन रुग्णांना जीवदान मिळाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here