महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेकडून आर्थिक मदत
Twitter: @maharashtracity
मुंबई: मुंबईतील रुग्ण लक्ष्मण भोसले यांच्या दोन्ही मूत्रपिंड काही महिन्यांपासून निष्क्रिय झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले होते. मात्र त्याचवेळी त्यांना मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यास फारच कमी वेळ उरल्याचेही सांगण्यात आले. यावेळी रुग्ण लक्ष्मण यांचे भाऊ तसेच इतर कुटुंबियांनी असमर्थता दर्शवल्याने चिंता वाढू लागली. दरम्यान, त्यांच्या पत्नी योगीता भोसले यांनी डॉक्टरांना स्वतःचे मूत्रपिंड जुळते का ते पाहण्याची तपासणी करण्याची विनंती केली. कर्मधर्मसंयोगाने रक्तगट आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या निकषात बसत असल्याचे डॉक्टरांना त्यांना सांगितले.
पत्नी योगीता यांनी विचार न करता स्वतःचे मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी संमती दिली. याचवेळी योगीता यांना काही जणांनी मूत्रपिंड दान करण्याबाबतचे सुचवले. तर घरच्यांनीही नकार देत योगीता यांना मदत करण्यास ही हात मागे घेतले. अशा ’ना माहेर-ना सासर‘ अशी स्थिती असताना महाराष्ट्र रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे राज्य सचिव भिमेश मुतुला धाऊन आले. त्यांनी तात्काळ ५०,००० रुपयांची थेट मदत केली. यामुळेच पत्नी योगीता पतीला मूत्रपिंड दान करु शकल्या. प्रत्यारोपणानंतरील उपचार महापालिकेच्या केईएम रुग्णालयात होणार असून लागणाऱ खर्चास मदत देण्यात येणार असल्याचे भिमेश मुतुला यांनी सांगितले.