महाड

किल्ले रायगडाच्या (Raigad Fort) पायथ्याशी असलेल्या रायगड वाडी गावातील श्री झोलाई देवी (Zolai Devi) मंदिराचा अकरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी स्थानिक ग्रामस्थांसह मुंबई, ठाणे, सुरत, बडोदा, अहमदाबाद, पुणे आणि इतर शहरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या रायगड वाडी गावातील जागरूक देवस्थान असलेल्या श्री झोलाई देवी मंदिराचा ११ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गावामध्ये आनंदाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. रायगड वाडी गाव परिसरातील नेवाळी, हिरकणी वाडी, परडी, कोळी आवाड, टकमकी वाडी, छत्री निजामपूर, वाघेरी, वारंगी, पाचाड आदि गावातील ग्रामस्थांनी श्री झोलाई देवीचे दर्शन घेतले.

या उत्सवाच्या निमित्ताने गावातून पहाटेच प्रभात फेरी आणि देवीची पालखी काढण्यात आली. या प्रभात फेरीमध्ये टाळ मृदुंगाच्या तालावर तालावर गायल्या जाणाऱ्या अभंगांमध्ये महिला, तरुण आणि वयोवृध्द नागरिक मंत्रमुग्ध झाले होते. प्रभात फेरीनंतर कलश पूजन देवीचे पूजन असे विविध धार्मिक पूजा पठनाचे कार्यक्रम आयोजित केले गेले होते. या सोहळ्याच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला.

महाआरती, महिलांचा हळदीकुंकू, भजन, असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या झोलाई देवी मंदिर उत्सवाकरता मुंबई, सुरत, बडोदा, अहमदाबाद, ठाणे, पुणे येथील मंडळांनी तसेच महिला मंडळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन हा उत्सव आनंदमयी वातावरणात पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेतले. या सोहळ्यासाठी ज्या ज्या लोकांनी विशेष मदत केली त्या सगळ्यांचे सत्कार देखील ग्रामस्थ मंडळाकडून करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here