हर्णै येथील मॅजिक चालकाचाही मृत्यू     

By Milind Mane

Twitter: @manemilind70

महाड: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली – हर्णै राज्य मार्गावर आसूद येथे रविवारी दुपारच्या सुमारास ट्रक आणि मॅजिक रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पाच जण मृत्युमुखी पडले आहेत. या भीषण अपघात एकूण 14 जण जखमी झाले होते. यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे.

या अपघातात हर्णै येथील प्रवासी मॅजिक चालक अनिल उर्फ बॉबी सारंग यांचाही मृत्यू झाला आहे. दापोली पोलीस ठाण्यात याबाबत पंचनामा नोंद करण्याची कार्यवाही सुरू होती. या अपघातात जखमी प्रवाशांना दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्राथमिक उपचारानंतर काही प्रवाशांना पुढील उपचार करता पाठवण्यात आले आहे. 

दापोली तालुक्यात राज्यमार्गावर असलेल्या आसूद जोशी आळी येथे दुपारी 3.30 सुमारास हा अपघात झाला. या अपघातामध्ये पाचजण जण मृत्यूमुखी पडले आहेत. यामध्ये दोन मुलींसह अन्य दोघांचा सामावेश आहे. पाच जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू झाले आहेत. तर काही जखमीना मुबंईत हलवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

या दुर्दैवी भीषण अपघातात  5 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन चिमुकल्यांचाही समावेश आहे. मरियम गौफिक काझी (6), स्वरा संदेश कदम (8), संदेश कदम (55), फराह तौफिक काझी (27) सर्व राहणार अडखळ, अनिल उर्फ बॉबी सारंग (45) हर्णै अशी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.  

अपघातातील जखमीमध्ये पुढील जणांचा समावेश आहे.

विनायक हशा चौगुले (45), पाजपंढरी, श्रध्दा संदेश कदम (14), अडखळ, मिरा महेश बोरकर (22), पाडले, सपना संदेश कदम (34),  अडखळ, भुमी सावंत (17), हर्णे (मुंबई ट्रान्सफर), मुग्धा सावंत (14) हर्णे (मुंबई ट्रान्सफर), वंदना चोगले (38), पाजपंढरी, ज्योती चोगले (09), पाजपंढरी, विनोद चोगले (30) पाजपंढरी. या संपूर्ण अपघाताचा तपास दापोली पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here