औरंगाबाद: जालन्यातील कामानिमित्ताने मुंबईत केलेल्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना माध्यमातून समोर आली. या पिडीत मुलीचा मृत्यू संभाजीनगर येथील घाटी हॉस्पिटलमध्ये झाला यानंतर विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज दि.३१ ऑगस्ट, २०१९ रोजी घाटी हॉस्पिटल प्रशासन, मुंबई आणि संभाजीनगर पोलीस यांच्यासमवेत तपशीलवार चर्चा केली.या सदरील मुलीच्या मृत्यू प्रकरणात कोणी ही राजकारण करू नये ,आरोपींना कोणीही संरक्षण देणार नाही याची खात्री बाळगा, मी स्वतः आरोपींना कडक कारवाईची शिफारस शासनाकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना ना.डॉ.गोऱ्हे म्हणाला की, या मुलीच्या मृत्यू ही घटना अत्यंत दुःखदायक असून या मुलीच्या शवविच्छेदन करण्याची परवानगी कुटुंबाकडून मिळत नाही. परंतु मेडिकल आणि तपासाच्या दृष्टीने शवविच्छेदन करणे महत्वाचे असल्याने पोलिसांनी नियमानुसार करण्याचे अधिकार असले तरी त्यांनी जेष्ठ विधी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन निर्णय घेण्याची सूचना देखील डॉ.गोऱ्हे यांनी केली. पुढे बोलताना डॉ.गोऱ्हे म्हणाल्या सदरील घटनेच्या तपाससाठी उच्चास्तरीय समिती स्थापन करण्याची मागणी संघटनाकडून केली जात आहे या समितीत पोलीस पेशीतील डॉक्टर पदवी असलेल्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात यावा अशी देखील सरकाररा सूचना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पीडित मुलीला संद्गिग्ध प्रकारचा आजार होता व  तिला आयसीयू मध्ये दाखल करून घाटी हॉस्पिटलमधील आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम व प्रयत्न केले असल्याचे प्राथमिक अंदाजातून समोर येत आहे, परंतु न्यायालयाचा निर्णय अंतिम असतो असे देखील ना.डॉ.गोऱ्हे या म्हणाल्या.

लाल डोंगर परिसरात ही घटना घडली असल्याचे मुलीच्या नातेवाईक यांचे म्हणने आहे याठिकाणी स्वतः ना.डॉ.गोऱ्हे यांनी काम केलेले असून सदरील ठिकाणचे नागरिक अतिशय जागरूक असून आरोपी पकडण्यासाठी मदत होईल असा विश्वास ना.डॉ.गोऱ्हे यांनी व्यक्त करतानाच मुंबई पोलीसचे उपायुक्त शशी मीना यांना यापूर्वीच आरोपी शोधून शिक्षा देण्यासाठी निर्देश दिले होते. 
यावेळी घाटी हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर, माजी पोलीस उपायुक्त खुशलाचंद बाहेती, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, मुंबई येथील चेंबर पोलीस स्टेशनच्या मनीषा शिर्के, पीएसआय निलेश कानडे यांच्यासह घाटी हॉस्पिटलचे आरोग्य अधिकारी, डॉक्टर, पोलीस अधिकारी उपस्थित होते.

 संध्याकाळी ५ वा.सुभेदारी गेस्ट हाऊस येथे संभाजी नगर पोलीस आयुक्त श्री. चिरंजीवी प्रसाद यांनी ना.डॉ. नीलम गोर्हे यांना मुलीच्या नातेवाईकांनी शवविच्छेदन नासाठी सहकार्य देऊ केले असुन अंत्यसंस्कारासाठी ते मुलीचा देह ताब्यात घेणार आहेत.शासन डिसीपी क्राईम ,मुंबई यांचे कडे  तपास सोपवित आहेत.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here